शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp पासून Snapchat पर्यंत, अनेक टेक कंपन्यांचा आहे Ukraine शी संबंध, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:10 PM

1 / 7
Russia आणि Ukraine मध्ये युद्ध सुरु आहे. यातील युक्रेन या देशाचं नाव अनेकांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल. परंतु या देशाशी तुमचा संबंध टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेकदा नकळत आला असेल.
2 / 7
तुम्ही वापरत असलेले असे अनेक अ‍ॅप्स आणि सेवा आहेत ज्यांचा संबंध Ukraine शी आहे. यात तुमच्या आवडत्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा देखील समावेश आहे.
3 / 7
WhatsApp जगभरात वापरला जाणारा लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर आहे. परंतु भारतात इन्स्टंट मेसेजिंगला पर्यायी शब्द म्हणूनच याचा वापर केला जातो. या अ‍ॅपचे सहसंस्थापक Jan Koum यांचा जन्म 1976 मध्ये युक्रेनमधील Fastiv येथे झाला होता. ते एक युक्रेनियन स्थलांतरित आहेत. 2014 मध्ये त्यांनी WhatsApp फेसबुकला विकलं.
4 / 7
PayPal ही जगातील सर्वात पहिल्या पेमेंट पद्धतींपैकी एक आहे. भारतात जरी याचा वापर जास्त होत नसला तरी जगभरात याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. याचे सहसंस्थापक Maksymilian Rafailovych 'Max' Levchin हे युक्रेनियन-अमेरिकन आहेत.
5 / 7
तुमच्या ऑफिशियल ई-मेलमधील इंग्रजी व्याकरणाच्या चुका सुधारणाऱ्या Grammarly चा देखील युक्रेनशी संबंध येतो. या अ‍ॅपचे तिन्ही संस्थापक Max Lytvyn, Alex Shevchenko आणि Dmytro Lider युक्रेनचे नागरिक आहेत.
6 / 7
CleanMyMac चा वापर अ‍ॅप्पल मॅकवर क्लीनर म्हणून केला जातो. याची निर्मिती Kyiv मधील MacPaw नावाच्या कंपनीनं केली आहे.
7 / 7
लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप Snapchat मधील Masking टेक्नॉलॉजीची निर्मिती Looksery यांनी केली आहे, त्यांचं ऑफिस युक्रेनमधील तीन शहरांमध्ये आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान