By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:10 IST
1 / 8WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्सची संख्या जास्त असल्यामुळे स्कॅमर्सना सोपं टार्गेट मिळतात. स्कॅमर्स लोकांना वेगवेगळ्या प्रकारे जाळ्यात ओढतात आणि आता यामध्ये काही 'Mule' अकाउंट्स त्यांची मदत करत आहेत.2 / 8तुम्ही विचार करत असाल की हे 'WhatsApp Mule' अकाउंट नक्की काय आहे २०२६ मध्ये स्कॅमर्स लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचाच वापर करत आहेत. ही समस्या केवळ एका देशापुरती मर्यादित नसून, जागतिक स्तरावर अशा प्रकारचे स्कॅम सुरू आहेत. 'सायबर दोस्त'ने या संदर्भात धोक्याचा इशारा जारी केला आहे.3 / 8या स्कॅममध्ये फसवणूक करणारे लोक WhatsApp युजर्सना त्यांचं अकाउंट भाड्याने देण्यासाठी भुरळ घालतात. आतापर्यंत तुम्ही घर, गाडी किंवा इतर वस्तू भाड्याने देण्याबद्दल ऐकलं असेल, पण या प्रकरणात चक्क WhatsApp अकाउंट भाड्याने दिलं जातं.4 / 8या भाड्याने घेतलेल्या WhatsApp अकाउंट्सचा वापर बेकायदेशीर कामांसाठी केला जातो. याद्वारे लोकांना टार्गेट करणं, पैशांचे व्यवहार करणं आणि अशा अनेक गोष्टी केल्या जातात. अशा स्कॅमसाठी लोकांना 'घरबसल्या सहज पैसे कमवा' असे आमिष दाखवलं जातं.5 / 8जेव्हा एखादी व्यक्ती स्कॅमर्सच्या या जाळ्यात अडकते, तेव्हा त्याचे WhatsApp अकाउंट हायजॅक केलं जातं. त्यानंतर या अकाउंटचा वापर करून इतर लोकांना टार्गेट केले जाते.6 / 8बनावट लोन रिक्वेस्ट, फ्रॉड लिंक्स पाठवून इतर घोटाळ्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व कामांसाठी भाड्याने घेतलेल्या WhatsApp अकाउंटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.7 / 8अशा स्कॅमचा बळी ठरल्यामुळे किंवा आपले WhatsApp अकाउंट भाड्याने दिल्यामुळे तुम्हाला कायदेशीर चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय, WhatsApp तुमचं अकाउंट कायमचं बॅन करू शकतं. इतकेच नाही तर तुमचे पर्सनल चॅट्स, कॉन्टॅक्ट्स आणि फोटो-व्हिडीओ स्कॅमर्सच्या हाती लागू शकतात.8 / 8कोणताही अनोळखी QR कोड स्कॅन करू नका. सहज पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडू नका आणि आपले अकाउंट भाड्याने देऊ नका. WhatsApp सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' ऑन ठेवा. अशा कोणत्याही स्कॅमची तक्रार तुम्ही १९३० या क्रमांकावर किंवा 'चक्षु' पोर्टलवर करू शकता.