सावधान! WhatsApp वापरताना 'या' लिंकवर क्लिक करणं पडेल महागात; 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 02:28 PM2023-06-02T14:28:54+5:302023-06-02T14:38:41+5:30

WhatsApp : WhatsApp एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग App आहे. जगभरातील लाखो लोक त्याचा वापर करतात.

WhatsApp एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग App आहे. जगभरातील लाखो लोक त्याचा वापर करतात. सुरक्षेसाठी कंपनी युजर्सना अनेक फीचर्स देखील देते. सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. यामुळे युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होतं. यासोबतच Appमध्ये नियमित अपडेट्सही दिले जातात.

WhatsApp युजर्सचा अनुभव आणखी चांगला करता येईल आणि बगचे निराकरण करता येईल यासाठी हे असतं. मात्र, त्यानंतरही काही वेळा छोट्या-मोठ्या समस्या येत राहतात. आता अशाच एका बगबद्दल माहिती मिळाली आहे, ज्यामुळे अँड्रॉईड App क्रॅश होत आहे.

अँड्रॉईड ऑथॉरिटीच्या रिपोर्टनुसार, WhatsApp मधील बगमुळे अँड्रॉईड App क्रॅश होत आहे. जेव्हा युजर्स वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये wa.me/settings ही लिंक उघडतो तेव्हा हा बग ट्रिगर होतो.

साधारणपणे, या लिंकवरून WhatsApp चे सेटिंग पेज ओपन झालं पाहिजे. परंतु, याक्षणी ते Android डिव्हाइसेस क्रॅश करत आहे. या बगमुळे वैयक्तिक आणि ग्रुप चॅट दोन्ही प्रभावित होत आहेत. यामध्ये WhatsApp बिझनेसचाही समावेश आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ही लिंक ओपन केल्याने App क्रॅश होते. परंतु, यानंतर App सामान्यपणे रीस्टार्ट होईल. मिळालेल्या माहितीनुसार, या बगचा WhatsApp अँड्रॉईड व्हर्जन 2.23.10.77 वर परिणाम झाला आहे. मात्र, दुसऱ्या व्हर्जनवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

जर तुम्हीही अशा कोणत्याही समस्येचा सामना करत असाल तर ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला आधी App अपडेट करावं लागेल. कारण, कंपनीने बग दूर केला आहे. तरीही तुम्हाला समस्या असल्यास, तुम्हाला WhatsApp वेबवर जावे लागेल. हे WhatsApp चं ब्राउझर व्हर्जन आहे. सध्या, WhatsApp वेबवर या बगचा परिणाम होत नाही.

तुम्ही WhatsApp वेबद्वारे तुमच्या खात्यात सहजपणे लॉग इन करू शकता आणि हा क्रॅश ट्रिगर करणारा मेसेज डिलिट करू शकता. यानंतर जोपर्यंत तुम्हाला पुन्हा ही लिंक मिळत नाही तोपर्यंत तुमचा फोन क्रॅश होणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग एप WhatsApp मध्ये आता मेसेज एडिट करता येणार आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये झुकेरबर्गने लिहिलं आहे की, युजर्स आता पाठवलेले WhatsApp मेसेज एडिट करू शकतील.

मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आता तुम्ही 15 मिनिटांसाठी WhatsApp वर पाठवलेले मेसेज एडिट करू शकणार आहात'. WhatsApp मेसेज एडिट करण्यासाठी, पाठवलेला मेसेज प्रेस एंड होल्ड ठेवावा लागेल.

मेसेज प्रेस एंड होल्ड केल्यानंतर एडिटचा पर्याय दिसेल जिथून तुम्ही मेसेज एडिट करू शकता. तसेच एडिटेड मेसेजसाठी Edited चा टॅग केला जाईल. म्हणजेच ज्या व्यक्तीला मेसेज एडिट करून तो मेसेज पाठवला आहे. त्याला तो एडिट केल्याचं समजेल.

विशेष म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुम्ही आधी कोणता मेसेज पाठवला होता जो आता एडिट केला गेला आहे हे कळणार नाही. जसं पूर्वीचं ट्विट एडिट ट्विटमध्ये दिसत होतं, तसं WhatsApp मध्ये होणार नाही, इथे एडिट हिस्ट्री दिसणार नाही, फक्त एडिट केलेला टॅग दिसेल.

कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटलं आहे की, आता युजर्सचं चॅटिंग दरम्यान यामुळे अधिक कंट्रोल असेल आणि जर मेसेजमध्ये काही चूक झाली असेल तर ती 15 मिनिटांत एडिट करता येईल.