शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vivo Y31s लाँच; Snapdragon 480 5G प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन

By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 5:04 PM

1 / 10
नुकतंच क्वालकॉमनं Snapdragon 480 प्रोसेसरची घोषणा केली होती. या प्रोसेसरच्या माध्यमातून लो कॉस्ट स्मार्टफोन्समध्येही 5G चा सपोर्ट देता येणं शक्य आहे.
2 / 10
Snapdragon 4 सीरिजचा हा 5G सपोर्ट देणारा हा पहिला प्रोसेसर आहे. आता Vivo ने आपला Y32s हा स्मार्टफोन लाँच केला आहे.
3 / 10
हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये Snapdragon 480 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
4 / 10
सध्या हा फोन केवळ चीनमध्ये उपलब्घ असून लवकरच हा भारतातही लाँच होण्याची शक्यता आहे.
5 / 10
Vivo Y31s सध्या दोन व्हेरिअंट उपलब्ध आहेत. यामध्ये 4GB + 128GB च्या व्हेरिअंटची किंमत १,४९८ येन म्हणजेच जवळपास १७ हजार रूपये आणि 6GB + 128GB जीबीच्या व्हेरिअंटची किंमत १,६९८ येन (जवळपास १९,३०० रूपये) इतकी आहे.
6 / 10
हा मोबाईल ग्रे, रेड आणि सिल्व्हर कलर्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या मोबाईची शिपिंग १५ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत किती असेल याबाबत मात्र कंपनीनं सध्या माहिती दिली नाहीये.
7 / 10
Vivo Y31s मध्ये ड्युअल नॅनो सीम सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच Funtouch OS 10.5 वर चालणारं अँड्रॉईडचं ११ व्हर्जन यात देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त या मोबाईलचा डिस्प्ले ६.५८ इंचाचा तो फुल एचडी आहे. तसंच तो ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह येतो. विवोच्या या फोनमध्ये   Adreno 619 GPU सह नवा स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसर देण्यात आला आहे.
8 / 10
फोटोग्राफीसाठी या मोबाईलमध्ये मागील बाजूला १३ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच २ मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सरही देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे.
9 / 10
या मोबाईलमध्ये 5,000mAh ची बॅटरी असून हा मोबाईल १८ वॅटचं फास्ट चार्जिंगही सपोर्ट करतो.
10 / 10
कनेक्टिव्हीटीसाठी या मोबाईलमध्ये 5G, 4G VoLTE, ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ 5.1, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाईप सी पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलVivoविवोchinaचीन