शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsAppवर आता पाठवा २५ जीबीची फाईल; ग्रुपमध्येही आता जाेडा १ हजार सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 12:24 PM

1 / 5
साेशल मेसेजिंग ॲप व्हाॅट्सॲपच्या युझर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच महत्त्वपूर्ण अपडेट देणार असून त्याचा युझर्सला माेठा फायदा हाेणार आहे.
2 / 5
व्हाॅईस किंवा व्हिडिओ काॅलवर एकाच वेळी आता ३२ युझर्स जाेडता येतील. तसेच तब्बल २५ जीबी एवढी माेठी फाईलदेखील पाठविता येणार आहे.
3 / 5
‘मेटा’चे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. व्हाॅट्सॲपवर कम्युनिटीज सुरू करण्यात येत आहे. यामुळे ग्रुप्स आता अधिक चांगले हाेतील. याशिवाय इतर अनेक सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहेत, असे झुकरबर्ग म्हणाले. लवकरच नव्या अपडेट्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत.
4 / 5
एका ग्रुपमध्ये आता १०२४ सदस्य जाेडता येतील. ही मर्यादा ऑक्टाेबरमध्येच २५६ वरून वाढवून ५१२ इतकी करण्यात आली हाेती. व्हाईस किंवा व्हिडिओ काॅलवर एकाच वेळी ३२ जणांना जाेडता येईल.
5 / 5
२५ जीबीपर्यंतची फाईल पाठविता येणार. सध्या केवळ १६ एमबीपर्यंतचीच मर्यादा. ब्राॅडकास्ट संदेशदेखील ५००० जणांना पाठविता येईल. युझर्सना आता ‘इन चॅट पाेल’ ही नवी सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये एखाद्या विषयावर सर्वेक्षण करता येणार आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान