जबरदस्त! WhatsApp वर आता फक्त 5 मिनिटांत मिळणार 10 लाखांचं कर्ज; जाणून घ्या, नेमकं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:37 IST
1 / 9इन्स्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या WhatsApp वरून कर्ज मिळू शकतं असं जर कोणी सांगितलं असतं तर सुरुवातीला विश्वासच बसला नसता. पण हो हे खरं आहे. WhatsApp ने आपल्या युजर्सना कर्ज देण्याची नवी सेवा सुरू केली आहे. 2 / 9WhatsApp वर अवघ्या पाच मिनिटांत कर्ज मिळणार आहे. पण हे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज नसून व्यवसाय कर्ज असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, व्यवसाय करणाऱ्या युजर्सना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. 3 / 9नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) IIFL फायनान्सने WhatsApp द्वारे व्यवसाय करणाऱ्या युजर्सना कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. एनबीएफसीतर्फे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून त्यामध्ये याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.4 / 9WhatsApp वर त्वरित व्यवसाय कर्ज देणारी ही देशातील पहिली कंपनी आहे. यासाठी युजर्सना किमान कागदपत्रांची आवश्यकता असेल. त्याच वेळी युजर्सना पाच मिनिटांत हे कर्ज वितरित केले जाईल. युजर्स दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.5 / 9कर्ज देण्यासाठी व्हॉट्सअॅपने कृत्रिम बुद्धिमत्ता बॉट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या बॉटद्वारेच KYC आणि बँक खात्याचे डिटेल्स मॅच केले जातात. जाणून घेऊया, ही प्रक्रिया नेमकी कशी असणार? 6 / 9जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला 9019702184 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. तुम्हाला या नंबरवर हाय मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि व्यवसाय यासारखी माहिती विचारली जाईल.7 / 9यानंतर भागीदारीशी संबंधित प्रश्नही विचारले जातील. येथे तुम्हाला टर्नओवरची माहिती देखील विचारली जाईल. सर्व माहिती सबमिट केल्यानंतर, बॉट तुम्हाला तुमचा क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी तपशील देण्यास सांगितले जाईल.8 / 9IIFL तुमचा क्रेडिट इतिहास OTP द्वारे व्हेरिफाय करेल. त्यानंतर कर्जाची रक्कम, व्याज दर आणि ईएमआयची संपूर्ण माहिती त्यात दिली जाईल. शेवटी तुम्हाला कर्ज मंजूर होण्यापूर्वी तुमच्या पात्रतेनुसार कर्जाची रक्कम निवडण्याची संधी मिळेल.9 / 9कर्ज घेण्यासाठी, युजर्सला बँक खाते आणि IFSC कोड द्यावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमचे कर्जाचे पैसे तुमच्या बँकेत हस्तांतरित केले जातील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.