ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
वाय-फाय स्लो चालतोय? 'या' ५ मिनिटांच्या कामामुळे इंटरनेट होईल सुपरफास्ट; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 17:43 IST
1 / 7आजच्या डिजिटल युगात घरात वाय-फाय असणे ही चैन नसून गरज बनली आहे. ऑफिसचे काम असो, मुलांचा अभ्यास किंवा मनोरंजनासाठी स्ट्रीमिंग, या सर्वांसाठी वेगवान इंटरनेट आवश्यक असते. मात्र, अनेकदा महागडा प्लॅन घेऊनही इंटरनेटचा स्पीड कासवगतीने चालतो. यामुळे कामात व्यत्यय येतो आणि चिडचिड होते. 2 / 7जर तुम्हीही स्लो इंटरनेटने त्रस्त असाल, तर काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या वाय-फायचा स्पीड रॉकेटसारखा वाढवू शकता.3 / 7तुमचा राउटर कुठे ठेवला आहे, यावर इंटरनेटचा स्पीड अवलंबून असतो. अनेकदा राउटर आणि तुमच्या कामाच्या जागेत अंतर जास्त असल्यास सिग्नल कमकुवत होतात. शक्य असल्यास, राउटर अशा खोलीत ठेवा जिथे तुम्ही सर्वाधिक वेळ काम करता. राउटर आणि तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये भिंतीसारखे अडथळे कमी असतील, याची काळजी घ्या. जर तुम्ही गेमिंग किंवा जड कामासाठी इंटरनेट वापरत असाल, तर वाय-फायऐवजी थेट 'इथरनेट केबल' वापरणे कधीही उत्तम!4 / 7अनेक जण राउटर टीव्हीच्या मागे, फ्रीजवर किंवा मायक्रोवेव्हच्या जवळ ठेवतात. मात्र, ही सर्वात मोठी चूक आहे. टीव्ही, मायक्रोवेव्ह आणि इतर धातूच्या वस्तू वाय-फाय सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे राउटर नेहमी उघड्या जागेवर आणि जमिनीपासून थोड्या उंचीवर ठेवावा, जेणेकरून सिग्नल सर्वत्र नीट पसरतील.5 / 7तुमचे घर मोठे असेल किंवा दोन मजली असेल, तर एकाच राउटरची रेंज सर्व कोपऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण असते. अशा वेळी 'वाय-फाय एक्सटेंडर' हे एक उत्तम साधन ठरू शकते. हे छोटे उपकरण तुमच्या राउटरचे सिग्नल खेचून ते घराच्या त्या कोपऱ्यात पोहोचवते जिथे नेटवर्क मिळत नाही. यामुळे बाल्कनी किंवा बेडरूममध्येही तुम्हाला विनाअडथळा इंटरनेट मिळेल.6 / 7जसे आपण फोन किंवा लॅपटॉप रिफ्रेश करतो, तसेच राउटरलाही आरामाची गरज असते. आठवड्यातून एकदा राउटर बंद करून पुन्हा सुरू केल्यास त्यातील तात्पुरते तांत्रिक दोष दूर होतात आणि स्पीड सुधारण्यास मदत होते.7 / 7इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी या साध्या पण प्रभावी टिप्स नक्की वापरून पाहा. यामुळे तुमचे काम अधिक गतिमान होईल आणि स्ट्रीमिंगचा आनंदही द्विगुणित होईल.