स्मार्टफोन चोरी झाल्यास 'असं' डिलीट करा GPay अकाऊंट, खातं राहिल एकदम सुरक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 06:12 PM2022-01-15T18:12:02+5:302022-01-15T18:23:06+5:30

हल्ली स्मार्टफोनमधूनच सर्व बँकिंग व्यवहार आणि डिजिटल पेमेंट पर्याय सहज उपलब्ध होऊन जातात. पण स्मार्टफोनच चोरीला गेला आणि तुमच्या बँक खात्याचा गैरवापर केला गेला तर? नेमकं काय करायचं जाणून घेऊयात...

जगभरात इंटरनेटचा वापर आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आता सर्व महत्त्वाची कामं स्मार्टफोनच्या माध्यमातून सहजपणे पूर्ण करता येतात. तुमचं खातं कोणत्याही बँकेत असलं तरी आता घरबसल्या तुम्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे इतरांना पाठवू शकता. यासाठी GPay सारख्या पर्यायाला लोक अधिक पसंती देत आहेत.

Gpay चा वापर करुन आता बहुतांश डिजिटल पेमेंट व्यवहार होत असतात. पण तुमचा स्मार्टफोनच चोरीला गेला आणि तुमच्या Gpay चा गैरवापर केला जाऊ शकतो याची भीती तुम्हाला वाटली तर नेमकं काय करावं याची माहिती आपण आज जाणून घेऊयात.

पेमेंट बेस टेक कंपन्या सध्या युझर्ससाठी एक्स्ट्रा सिक्युरिटी ब्लॅंकेटची सुविधा देतात. यामाध्यमातून युझर त्या संबंधित अॅपला पासकोडच्या माध्यमातून सुरक्षित ठेवू शकतो. लोक सिक्युरिटीसाठी फोनमध्ये स्क्रीन लॉकचा देखील वापर करतात. पण हॅकर्स हल्ली यातही पळवाटा काढण्यात तरबेज झाले आहेत.

अशावेळी नेमकं काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. तर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे चोरी झालेल्या तुमच्या स्मार्टफोनमधून तुमचं Gpay अकाऊंट बंद करण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध करुन दिला तर? सारी चिंता एका झटक्यात मिटेल.

तुम्ही तुमच्या अँड्रॉईड फोनमधलं Gpay अकाऊंट स्मार्टफोन हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतरही डिलीट करू शकता. तुम्हाला यासाठी सर्वात आधी दुसऱ्या फोनवरुन 18004190157 या क्रमांकावर फोन करावा लागेल.

यानंतर Other issues या पर्यायाची निवड करा. पुढे तुमचा कॉल कस्टमर केअर प्रतिनिधीशी जोडून दिला जाईल. संबंधित प्रतिनिधी तुम्हाला तुमचं अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी मदत करेल. यासाठी तुम्हाला तुमचं रजिस्टर गुगल अकाऊंट आणि मोबाइल नंबर व्हेरिफाय करावा लागेल.

याव्यतिरिक्त आणखी एक पर्याय देखील उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या अँड्रॉईड अकाऊंटमधून सर्व माहिती डिलीट करुन टाकू शकता. यासाठी तुम्हाला android.com/find हे ब्राऊझरमध्ये ओपन करावं लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या Google Account वर साइन इन करावं लागेल.

Google Find My Device मध्ये तुम्हाला Play Sound, Secure Device आणि Erase Device असे पर्याय दिसतील. यातील Erase Device या पर्यायवर क्लिक करावं लागेल. पुढे खाली स्क्रोल करुन Erase Device वर शेवटचं क्लिक करुन अप्रूव्हल दिलं की तुमच्या फोनमधील संपूर्ण डेटा कायमस्वरुपी डिलीट होऊन जाईल.