शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डेटा लिकमधून मोठा खुलासा; WhatsApp नाही, तर Mark Zuckerberg वापरतात 'हे' प्रतिस्पर्धी App

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 9:35 AM

1 / 15
सोशल मीडिया साईट फेसबुकच्या युझर्सचा डेटा लिक झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं.
2 / 15
यावेळी केवळ युझर्सच नाही, तर Facebook चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांचा डेटाही लिक झाल्याची माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे. यातून एक मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे.
3 / 15
मीडिया रिपोर्ट्सुसार मार्क झुकेरबर्ग हे WhatsApp नाही तर त्यांचं प्रतिस्पर्धी अॅप Signal चा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
4 / 15
समोर आलेल्या माहितीनुसार फेसबुक युझर्सचा जो डेटा लिक झाला आहे. त्यात झुकेरबर्ग यांचाही मोबाईल क्रमांक होता.
5 / 15
५३ कोटींपेक्षा अधिक फेसबुक युझर्सचा खासगी डेटा यावेळी लिक झाला आहे. यामध्ये तब्बल ६० लाख भारतीय युझर्सचाही समावेश आहे.
6 / 15
डेटा लिकमध्ये युझर्सचा आयडी, मोबाईल क्रमांक, ईमेल, स्थान, जन्मतारीख आणि मॅरिटल स्टेटसचा समावेश आहे.
7 / 15
फेसबुकच्या या डेटा लिकमध्ये मार्क झुकरबर्ग यांचा नंबरही लिक झाला आहे, ज्यामुळे ते कोणतं मॅसेजिंग अ‍ॅप वापरताच हे समोर आलं आहे.
8 / 15
एका सुरक्षा संशोधकाने खुलासा केला आहे की झुकरबर्ग त्याच्या लिक झालेल्या नंबरसह 'सिग्नल' या अ‍ॅपचा वापर करतात.
9 / 15
सुरक्षा तज्ज्ञ डेव्ह वॉकर यांनी ट्विटर मार्क झुकरबर्ग यांच्या लिक झालेला नंबर स्क्रिनशॉटद्वारे दाखवला आहे.
10 / 15
यात त्यांनी झुकेरबर्ग हे 'सिग्नल'वर असल्याचंही म्हटलं आहे. या डेटा लिकमध्ये फेसबुकचे सह-संस्थापक Chris Hughes आणि Dustin Moskovitz यांची माहितीही सामील आहे.
11 / 15
झुकेरबर्ग यांच्यासोबत या दोघांचादेखील डेटा लिक झाला आहे. रिपोर्टनुसार हा डेटा २०२० मध्ये लिक झाला होता.
12 / 15
फेसबुकमधील एका बगमुळे फेसबुक अकाऊंट्ससोबत युझर्सचे मोबाईल क्रमांकही दिसत होते. फेसबुकनं हा बग ऑगस्ट २०१९ मध्ये ठीक केल्याचंही सांगितलं होतं.
13 / 15
फेसबुकमधील एका बगमुळे फेसबुक अकाऊंट्ससोबत युझर्सचे मोबाईल क्रमांकही दिसत होते. फेसबुकनं हा बग ऑगस्ट २०१९ मध्ये ठीक केल्याचंही सांगितलं होतं.
14 / 15
काही दिवसांपूर्वी WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीवरूनही वाद झाला होता. त्यानंतर नवी प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट करण्याची मर्यादा वाढवण्यात आली होती.
15 / 15
नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा युझर्सच्या चॅट किंवा प्रोफाईल डेटाशी काहीही घेणंदेणं नाही असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. WhatsApp च्या एन्ड टू एन्ड इनक्रिप्शन पॉलिसीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही आणि युझर्सचं चॅट सुरक्षित राहिल असंही कंपनीनं म्हटलं होतं.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग