शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:27 IST

1 / 8
Social Media Platform Earning : सध्या सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फक्त मित्रांसोबत जोडणारे किंवा टाईमपास करणारे माध्यम राहिलेले नाही. हे प्लॅटफॉर्म अब्जावधी डॉलर्सची कमाई करणारे एक मोठे साधन बनले आहे.
2 / 8
सोशल मीडियावरील बंदीवरुनच नेपाळमध्ये मोठे निदर्शन झाले. आंदोलनादरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली आणि अखेर तेथील पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला.सोशल मीडियामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या तिन्ही प्लॅटफॉर्मवर युजर्सची संख्या कोट्यवधी- अब्जावधीमध्ये आहे. या प्लॅटफॉर्मवरुन पैसे कमावता येतात. पण सर्वाधिक कमाई नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्मला होते? चला जाणून घेऊया.
3 / 8
फेसबुक हे जगातील सर्वात मोठे मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. वर्ष 2023 च्या अहवालानुसार, फेसबुकचे 3 अब्जांहून अधिक युजर्स आहेत. याच्या कमाईचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे जाहिरात.सर्व ब्रँड, मोठे आणि लहान, फेसबुकवर त्यांच्या जाहिराती चालवतात आणि कंपनीच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे ९७% उत्पन्न ते देते.
4 / 8
२०२३ मध्ये, फेसबुकने सुमारे ११७ अब्ज डॉलर्सची कमाई केली, यामध्ये मोबाईल जाहिरातींचा सर्वाधिक वाटा होता. भारतात फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत. कंपनीला भारतातून मोठा नफा मिळतो.
5 / 8
इंस्टाग्राम देखील मेटा या कंपनीचा प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाचे कमाईचे मॉडेल देखील जवळजवळ सारखेच आहे, म्हणजे जाहिराती. पण इन्फ्लुएंसर मार्केटिंग आणि इंस्टाग्रामवरील रील्समुळे ते वेगळे झाले आहे. ब्रँड थेट क्रिएटरांना स्पान्सर करतात, यामुळे कंपनीचे जाहिरात मूल्य आणखी वाढते.
6 / 8
अहवालानुसार, मेटाच्या कमाईत फक्त इंस्टाग्रामचा वाटा ३०-३५% आहे. २०२३ मध्ये इंस्टाग्रामचे जाहिरातींचे उत्पन्न सुमारे ५० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले. विशेषतः फॅशन, सौंदर्य, प्रवास आणि तंत्रज्ञान उत्पादनांच्या जाहिराती येथे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
7 / 8
ट्विटर हे जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे, पण महसूलाच्या बाबतीत ते फेसबुक आणि इंस्टाग्रामपेक्षा मागे आहे. २०२२ मध्ये एलॉन मस्क यांनी ते विकत घेतल्यानंतर कंपनीने जाहिरातींच्या उत्पन्नापैकी जवळजवळ अर्धा भाग गमावला आहे.
8 / 8
२०२३ मध्ये ट्विटरची अंदाजे कमाई सुमारे ३ अब्ज डॉलर आहे. मस्क यांनी त्यात सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केले आहे, याद्वारे कमाई वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण जाहिरातींचे उत्पन्न अजूनही कंपनीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानInstagramइन्स्टाग्रामFacebookफेसबुकTwitterट्विटर