शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! २० वर्षीय मुलीनं Google, Facebook, Microsoft कंपन्यांकडून कमवले ४४ लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:55 IST

1 / 11
Microsoft कडून २२ लाखांचे बक्षीस घेऊन चर्चेत आलेल्या २० वर्षीय आदिती सिंहचं कधीकाळी डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. परंतु ती आता सायबर एनालिस्ट बनली आहे. अलीकडेच आदितीनं Microsoft Azure क्लाउड सिस्टममध्ये एक दोष शोधला होता. त्यामुळे कंपनीने तिला बक्षीस म्हणून २२ लाख रुपये दिले होते.
2 / 11
अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी आदितीने अनेकदा बड्या कंपन्यांच्या बग्समध्ये दोष शोधून बक्षीस मिळवलं आहे. त्रुटी शोधून तिने आतापर्यंत ६० हजार डॉलर्स म्हणजे ४४ लाख रुपये कमवले आहेत. आदितीने आतापर्यंत फेसबुक, माइक्रोसॉफ्ट, टिकटॉक, इथेरियमसह ४० पेक्षा जास्त कंपन्यांकडून बक्षीस मिळवलं आहे.
3 / 11
आदिती सिंहला सुरुवातीच्या काळात सायबर सिक्युरिटी एनालिस्ट बनण्याची इच्छा नव्हती. तिचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं होतं म्हणून तिने मेडिकल शिक्षण सुरू केले. ती मेडिकल कॉलेजमध्ये एन्ट्रेंस परीक्षा देत होती. परंतु त्यात यश आलं नाही म्हणून तिने तिचं क्षेत्र बदललं.
4 / 11
मेडिकल सोडल्यानंतर आदितीने सायबर सिक्युरिटीत तिची आवड निर्माण केली. तिने बेसिक हॅकिंग टूल्स वापरण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा तिने शेजाऱ्यांच्या Wifi पासवर्ड हॅक केला. आदितीने मागील वर्षी बाउंटी हंटिग सुरु केली. याच काळात तिला हारवर्ड यूनिवर्सिटी, स्टेनफोर्ड युनिवर्सिटी, कोलंबिया युनवर्सिटीकडून अप्रिसिएशन लेटर मिळालं.
5 / 11
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदितीनं Mapmyindia सोबत सायबर सिक्युरिटी एनालिस्ट म्हणून काम सुरू केले. टिकटॉक, फेसबुक यामध्ये तिने बग्स सोडले. त्यासाठी फेसबुकने तिला ७५०० डॉलर्स म्हणजे ५.४० लाख रुपये बक्षीस म्हणून दिले होते.
6 / 11
आतापर्यंत तिने वेगवेगळ्या कंपनी प्रोग्राममध्ये बग्स शोधून जवळपास ४४ लाख रुपये जमा केले आहेत. टेक कंपन्या बाउंटी प्रोग्रामचं आयोजन करतात. अशावेळी जर कोणी त्या प्रोग्राममध्ये दोष शोधून काढला आणि रिपोर्ट पाठवला. तो दोष खरचं आढळला तर युजर्सला बक्षीस दिलं जातं. आदितीने फेसबुक, माइक्रोसॉफ्ट, गूगल यासाठी आतापर्यंत काम केले आहे.
7 / 11
हा मार्ग आदितीसाठी सोप्पा नव्हता. सुरुवातीच्या काळात तिला अनेकदा नकारात्मक प्रतिसाद मिळाला परंतु तिने तिची प्रॅक्टिस सुरु ठेवली. त्यानुसार या प्रोफेशनमध्ये टाइम आणि पेशेंस असणं गरजेचे आहे.
8 / 11
बग्स शोधण्यासाठी आदितीला फेसबुक, टिकटॉक, माइक्रोसॉफ्ट, Mozila, Paytm,HP सारख्या ४० बड्या कंपनीच्या बाउंटी प्रोग्राममधून बक्षीस मिळवलं आहे. त्याचसोबत आदितीला अनेक नामांकित विद्यापीठातून प्रशंसापत्र मिळालं आहे.
9 / 11
आदिती सिंहला गूगलच्या बग हंटर हॉल ऑफ फेममध्ये जागा मिळाली आहे. आदितीच्या या यशाने अनेक युवक-युवती प्रेरित झाले आहेत. आदितीच्या मते, या क्षेत्रात अनेक संधी आहेत. बहुतांश छोट्या कंपन्यांही बाउंटी प्रोग्रामचं आयोजन करतात.
10 / 11
या क्षेत्रात येणाऱ्या नवयुवकांना आदिती सांगते की, कोणत्याही शिक्षणाशिवाय कमवण्याचा मार्ग निवडू नका. शिक्षण पूर्ण झाल्यावरच कमवण्याकडे लक्ष द्या. यात तुम्हाला पेशेंस ठेवण्याची गरज आहे. चुकांमधून शिका आणि पुढे जा
11 / 11
सध्या बाउंटी हंटिंग प्रोग्रॅम पुढे जारी ठेवायचा आहे. माझे आईवडीलच माझा आदर्श आहेत. पालकांनी माझ्या प्रत्येक निर्णयाचा आदर केला आहे. नेहमी माझ्या कुटुंबाने माझी साथ दिली आहे. पाठिंबा दिला आहे. जास्तीत जास्त तरूणांनी या क्षेत्रात यावं यासाठी प्रयत्न करेन
टॅग्स :googleगुगलFacebookफेसबुक