शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! तुम्हालाही येतोय Income Tax चा असा मेसेज? तर लिंकवर अजिबात क्लिक करु नका, त्याआधी हे वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 7:18 PM

1 / 8
सध्या सायबर गुन्हेगार ग्राहकांना लुटण्यासाठीची एकही संधी सोडत नाहीत. तुमची फक्त एच चूक त्यांच्यासाठी मोठी संधी ठरते आणि तुमची आजवरची सर्व कमाई लुबाडली जाऊ शकते. त्यामुळे ईमेल, मोबाइस मेसेजबाबत आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
2 / 8
सध्या आयकर विभागाच्या नावानं इन्कम टॅक्स रिफंडसाठी तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड क्रमांकाची मागणी केली जाऊ लागली आहे. पण आयकर विभागाकडून कधीच तुमच्या डेबिट कार्डची किंवा तुमच्या CVV क्रमांकाची मागणी केली जात नाही.
3 / 8
आयकर विभागाच्या नावानं तुमच्याकडे मोबाइल मेसेजमध्ये एखाद्या लिंकवर क्लिक करुन त्यावर तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा CVV नमूद करण्यास सांगितलं जात असेल तर संबंधित मेसेज फेक आणि फ्रॉड मेसेज आहे.
4 / 8
इन्कम टॅक्स विभागाच्या नावानं रिफंडसाठीच्या मेसेजवर कोणतीही वैयक्तीक माहिती देऊ नये. यासोबतच मेसेजमधील लिंकवर क्लिक करणं देखील टाळावं. कारण आयकर विभागाकडून कोणतीही लिंक कधीच पाठवली जात नाही. त्यामुळे आयकर विभागानंही याची दखल घेतली आणि सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
5 / 8
कोणत्याही मोबाइल एसएमएसला रिप्लाय देण्याआधी तो आधी पूर्णपणे नीट वाचून घ्यायला हवा आणि त्याची पुष्टी करुन घ्यायला हवी, असा सल्ला आयकर विभागानं दिला आहे.
6 / 8
आयकर भरण्यासाठी आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी फक्त http://incometax.gov.in ही एकच लिंक अधिकृत आहे. याशिवाय दुसरी कोणतीही लिंक आयकर विभागाकडून जारी केली जात नाही. त्यामुळे रिफंड मिळवण्यासाठीचं मृगजळ दाखवून तुमच्याशी फ्रॉड केला जाऊ शकतो याची काळजी घ्यायला हवी.
7 / 8
फेक मेसेजमध्ये एक लिंक देण्यात येते आणि त्यावर क्लिक करण्यासाठी ग्राहकाला भाग पाडलं जातं. त्यावर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगार तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती चोरतात आणि त्याचा गैरवापर केला जातो.
8 / 8
त्यामुळे इन्कम टॅक्स संबंधिचा कोणताही मोबाइल मेसेज तुम्हाला आला तर थोडा वेळ देऊन सावध राहून मेसेजची पडताळणी केली तर होणारा धोका व नुकसान टाळता येऊ शकतं. यात सर्वात आधी मेसेज कोणत्या नावानं आला आहे हे तपासून पाहावं. यात काहीतरी गडबड नक्की दिसून येईल. इन्कम टॅक्सच्या स्पेलिंगमध्ये काहीतरी फेरफार करुन ग्राहकांना फसवण्याची युक्ती सायबर गुन्हेगारांकडून वापरली जाते.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Slabआयकर मर्यादा