शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp सुरक्षित राहणार, पर्सनल चॅटची चिंता मिटणार; 'हे' आहेत ८ दमदार सिक्योरिटी फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:05 IST

1 / 10
WhatsApp हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग एप आहे, परंतु याच लोकप्रियतेमुळे ते हॅकर्स आणि स्कॅमर्सचे सोपं लक्ष्य बनत आहे. अलीकडेच 'GhostPairing' सारखे नवीन सायबर हल्ले समोर आले आहेत, ज्याद्वारे युजर्सचं अकाउंट त्यांच्या नकळत दुसऱ्या डिव्हाइसशी लिंक केलं जाऊ शकतं.
2 / 10
रिसर्चमध्ये असंही उघड झालं आहे की, 'कॉन्टॅक्ट डिस्कव्हरी' फीचरमुळे कोट्यवधी मोबाईल नंबर आणि प्रोफाइल डेटा लीक होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, WhatsApp चे काही सुरक्षा फीचर्स ऑन करणं अत्यंत आवश्यक झालं आहे.
3 / 10
WhatsApp चं प्रायव्हसी चेकअप फीचर युजर्सना त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्स एकाच ठिकाणाहून नियंत्रित करण्याची सुविधा देतं. Settings > Privacy > Privacy Checkup मध्ये जाऊन तुम्ही प्रोफाइल फोटो, स्टेटस आणि 'About' सेक्शन कोण पाहू शकतं हे ठरवू शकता. तसेच तुमचे 'Last Seen' आणि 'Online' स्टेटस देखील लपवू शकता.
4 / 10
या फीचरमुळे तुमचे मेसेजेस ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होतात. यासाठी तुम्ही २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवसांचा पर्याय निवडू शकता. Settings > Privacy > Default Message Timer मध्ये जाऊन तुम्ही हे सर्व नवीन चॅट्ससाठी लागू करू शकता.
5 / 10
अकाउंट हॅकिंगपासून वाचवण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे फीचर आहे. Settings > Account > Two-Step Verification मध्ये जाऊन तुम्ही एक सिक्युरिटी पिन (PIN) सेट करू शकता. यासोबत ईमेल आयडी जोडल्यास पिन विसरल्यास अकाउंट रिकव्हर करणं सोपं जातं. आता WhatsApp 'पासकी' सपोर्ट देखील देतं.
6 / 10
WhatsApp मध्ये तुम्ही फेस आयडी, टच आयडी किंवा फिंगरप्रिंट वापरून संपूर्ण ॲप लॉक करू शकता. याशिवाय, काही विशिष्ट खासगी चॅट्स तुम्ही 'चॅट लॉक' फीचर वापरून वेगळ्या फोल्डरमध्ये सुरक्षित ठेवू शकता, जे बायोमेट्रिक एक्सेसशिवाय उघडता येत नाहीत.
7 / 10
यामध्ये युजर्स अनोळखी नंबरवरून येणारे मेसेजेस ब्लॉक करू शकतात. तसेच 'IP ॲड्रेस प्रोटेक्शन' आणि 'लिंक प्रिव्ह्यू' डिसेबल करण्याचे पर्यायही मिळतात. यामुळे ऑनलाइन ट्रॅकिंग आणि फिशिंग स्कॅमचा धोका कमी होतो.
8 / 10
हे फीचर डेटावर अधिक नियंत्रण देतं. याद्वारे तुम्ही मीडिया ऑटो-डाऊनलोड थांबवू शकता आणि चॅटमधील माहिती WhatsApp च्या बाहेर शेअर होण्यापासून मर्यादित करू शकता. AI फीचर्सद्वारे मेसेजचा वापर कसा व्हावा, हे देखील याद्वारे नियंत्रित करता येतं.
9 / 10
जर तुम्ही रीड रिसिप्ट्स बंद केले, तर तुम्ही मेसेज वाचला आहे की नाही हे समोरच्या व्यक्तीला कळणार नाही. ही सेटिंग Privacy > Read Receipts मधून बंद करता येतं. मात्र हे ग्रुप चॅटला लागू होत नाही.
10 / 10
WhatsApp वरील फोटो आणि व्हिडीओ आपोआप गॅलरीमध्ये सेव्ह होणं ही देखील एक प्रायव्हसी रिस्क असू शकते. Settings > Chats > Save to Photos (Media Visibility) बंद करून तुम्ही हे थांबवू शकता. तसेच संवेदनशील फोटो पाठवण्यासाठी 'View Once' हा पर्याय वापरा, ज्यामुळे फोटो एकदा पाहिल्यावर आपोआप गायब होतो.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान