By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:35 IST
1 / 5सोलापूर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गोंधळ उडाला. भाजपाकडून वेळेत एबी फॉर्म न दिल्या गेल्याचा आरोप करत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दारावर प्रचंड गर्दी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 2 / 5निवडणूक अधिकाऱ्यांकडे जे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी भाजपाच्या उमेदवारांचे बी फॉर्म पोहोचलेच नाहीत. भाजपाने वेळेच्या आत बी फॉर्म दिले नाहीत, असा आरोप विरोधी नेत्यांनी केला. 3 / 5मनमानी कारभार करून सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या आडून अशी जुलूमशाही करत आहे, असा संताप विरोधी पक्षाच्या काही उमेदवारांनी केला. 4 / 5भाजपाच्या काही उमेदवारांचे एबी फॉर्म वेळ झाली तरी आले नाही. त्यानंतर काही एबी फॉर्म आल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. वेळ संपल्यानंतर भाजपाच्या उमेदवारांचे एबी फॉर्म स्वीकारू देणार नाही, असे सांगत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बंद दरवाजाच्या बाहेरच ठिय्या दिला. 5 / 5उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ३० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. पण, भाजपाचे काही उमेदवारांचे एबी फॉर्म तीननंतर घेऊन आल्याचा आरोप विरोधकांनी केला.