Man lift his scooty on shoulder : बोंबला! रस्त्यात पेट्रोल संपलं अन् पैसेही नव्हते; म्हणून खांद्यावर स्कुटी घेऊन निघाला पठ्ठ्या, पाहा व्हायरल फोटो

By manali.bagul | Published: March 2, 2021 04:27 PM2021-03-02T16:27:36+5:302021-03-02T17:05:36+5:30

Man lift his scooty on shoulder because of petrol Prize hike : पेट्रोलच्या भाववाढीला वैतागलेल्या एका तरूणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुरेसं पेट्रोल भरण्यासाठी या माणसाकडे पैसै नसावेत म्हणून त्यानं स्कुटी खांद्यावर घेण्याचं ठरवलं असावं.

देशभरात सध्याच्या काही दिवसात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांमध्ये असंतोष आणि संतापाची भावना पाहायला मिळत आहे. अनेकांना गाडीत पेट्रोल भरणं परवडेनासं झालं आहे.

पेट्रोलच्या भाववाढीला वैतागलेल्या एका तरूणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुरेसं पेट्रोल भरण्यासाठी या माणसाकडे पैसै नसावेत म्हणून त्यानं स्कुटी खांद्यावर घेण्याचं ठरवलं असावं

हिमाचल प्रदेशातील कुल्लुमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली आहे. या माणसानं पेट्रोल संपलं म्हणून स्कुटी रस्त्यावर सोडून न जाता खांद्यावर धरून हे जड वजन उचलून नेण्याचा प्रयत्न करत आहे.

. या फोटोतील व्यक्ती कोण आहे? हा व्हिडीओ कधीचा आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

खरंच पेट्रोलच्या भावावाढीमुळे या माणसाचं बिनसलंय की गाडी खराब झालीये याबाबत अद्याप काहीही समजलेलं नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पेट्रोलचा भाव १०० रुपयांवर गेल्यामुळे रागात या व्यक्तीनं आपली स्कुटी खांद्यावर उचलल्याचे अनेकजण म्हणत आहेत.

लोक या माणसाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या माणसाचे फोटो पाहून अनेकांचे डोळे उघडेच राहिले आहेत.