३९७ वर्षांनी अंतराळात दिसणार अद्भूत नजारा; पुन्हा पाहण्यासाठी ६० वर्ष वाट पाहावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 03:04 PM2020-12-07T15:04:43+5:302020-12-07T15:18:53+5:30

येत्या २१ डिसेंबरला अंतराळात एक चमत्कार पाहायला मिळणार आहे. असा चमत्कार याआधी १६२३ दिसून आला होता. या दुर्मिळ खगोलिय घटनेत बृहस्पती आणि शनि एकाच दिवशी एकमेकांच्या जवळ आलेले दिसून येतात.

यादरम्यान हा चमत्कार ताऱ्यांसारखा दिसत असल्यामुळे लोकांनासुद्धा पाहता येईल. हा अनोखा योग जवळपास ३९७ वर्षांनी दिसणार आहे. जर तुम्ही या वर्षी असा योग पाहिला नाही तर पुढची ६० वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागले.

१६२३ नंतर हे दोन ग्रह इतक्या जवळ आले आहेत. त्यांना एक "एक महान योग" म्हटलं जात आहे. एम. पी बिड़ला तारामंडळाचे प्रमुख देबी प्रसाद दुआरी यांनी सांगितले की, हा दुर्मिळ योग हजारो वर्षांनी एकदा तयार होतो.

ते म्हणाले, "जर पृथ्वीवरुन दोन खगोलिय पिंड एकमेकांजवळ दिसू लागले तर त्याला एक संयोग म्हणतात आणि जर शनी आणि बृहस्पतीचे असे संयोजन तयार झाले तर हा एक महा संयोग असतो."

२१ डिसेंबरला रात्री या दोन ग्रहांचे भौतिक अंतर जवळपास ७३५ मिलियन किमी असेल. त्यानंतर १५ मार्च २०८० ला असा नजारा पुन्हा पाहायला मिळेल.

२१ डिसेंबरला भारतातील प्रमुख शहरात सुर्यास्तानंतर एक अद्भूत नजारा लोकांना आपल्या डोळ्यांनी पाहता येईल.

Read in English