भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:19 IST
1 / 10कोविड १९ नंतर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत प्रचंड वाढली. एका रिपोर्टनुसार, २०२४-२५ या काळात १२.७ टक्के फुल-टाइम कर्मचारी घरातून काम करत आहेत तर २८.२ टक्के हायब्रिड मॉडेलवर म्हणजेच घर आणि ऑफिस असं काम करत आहेत. परंतु आता कर्मचारी WFH असणाऱ्या नोकऱ्यांपासून पळ काढत आहेत. मग त्यासाठी ६७ लाखाचे पॅकेज मिळत असेल तरीही...2 / 10एका भारतीय इंजिनिअरने परदेशी कंपनीकडून मिळालेली ७५ हजार डॉलर म्हणजे ६७ लाखांच्या पॅकेजची नोकरी नाकारली आहे. कारण त्याला ऑफिसला न जाता घरातून काम करण्यास सांगितले. बंगळुरूतील टेक इंजिनिअरने ही पोस्ट केली, त्यात त्याच्या मित्राने US डॉलर कमावण्याची संधी नाकारली आणि भारतातच इन ऑफिस जॉब सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं.3 / 10आशिष झा असं युवकाचे नाव आहे. त्याने त्याच्या मित्राबाबत पोस्ट केली आहे. या पोस्टवरून डॉलरमध्ये कमाई, रिमोर्ट वर्कमुळे होणारे नुकसान, टेकमधील जास्तीचा पगार आणि इतर गोष्टींवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका मित्राने वर्क फ्रॉम होम नोकरी नाकारली, ज्यात त्याला ७५ हजार डॉलर म्हणजेच ६७ लाख वार्षिक पगाराची नोकरी नाकारल्याचं सांगितले.4 / 10माझा मित्र ४ वर्षाचा अनुभव असणारा टेक्निकल सपोर्ट इंजिनिअर आहे. जो एका मिड साइज एआय स्टार्टअपसाठी काम करत आहे. त्याचा पगार वार्षिक ४८ लाख आहे. तरीही जर त्याने रिमोट जॉब स्वीकारला असता तर त्याचा पगार खूप वाढला असता, मात्र त्याने ही मोठी ऑफर नाकारली आणि ऑफिसमध्ये जाऊनच काम करण्याचा निर्णय घेतला.5 / 10परंतु हे पहिलेच प्रकरण नाही, ज्यात एखाद्या कर्मचाऱ्याने WFH सोबतच चांगल्या पगाराची नोकरी नाकारली. याआधीही एका अन्य टेक इंजिनिअरची पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यात रिमोर्ट वर्कशिवाय इन ऑफिस काम करण्याचा पर्याय निवडला होता. अखेर इन ऑफिससाठी WFH नोकऱ्यांपासून टेक्निकल इंजिनिअर का पळ काढत आहेत यामागची काही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.6 / 10सोशल मिडिया आइसोलेशन - MIT आणि स्टॅनफोर्ड स्टडीतून समोर आलं की, वर्क फ्रॉम होम करताना एकटेपणा, सोशल डिस्कनेक्शन आणि मोटिवेशनमध्ये कमतरता येत असल्याचं दिसून येते. तर ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना मानसिक सकारात्मकता मिळते.7 / 10प्रोफेशनल ग्रोथ - WFH च्या तुलनेत ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना प्रोफेशनल ग्रोथ जास्त होते, कारण सीनियर्सकडून तातडीने मार्गदर्शन मिळते. टीमसोबत काम करताना टायल टाइम लर्निंग चांगली होते, जी रिमोर्ट वर्क करताना खूप कमी असते.8 / 10प्रमोशन आणि हाइक्स - इन ऑफिस वर्क कर्मचाऱ्यांच्या कामाला अधिक सुलभ करते. कम्युनिकेशन आणि कामासाठी तुमची केडेबिलिटी चांगली समजून येते. ज्याचा फायदा प्रमोशनवेळी दिसून येतो. हाइक्स मिळवण्यासाठी ते सहज सोपे होते. 9 / 10चांगले नेटवर्क - ऑफिस कल्चरमध्ये सीनियर्स आणि लीडर्ससोबत कनेक्शन चांगले राहते. ज्यातून तुमचे नेटवर्क स्ट्रॉंग होते. तुमच्या करिअर ग्रोथसाठी हे फायदेशीर ठरते. 10 / 10बॅलेन्स्ड वर्क लाइफ - घरातून काम करणाऱ्यांना आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. ना ते ऑफिस वर्क चांगले करू शकतात ना कुटुंबाला वेळ देऊ शकतात. त्यातून स्ट्रेस वाढतो.