शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नादच खुळा! कोरोनाला पळवण्यासाठी बळीराजाने लावली 'आयडियाची कल्पना', पाहा भन्नाट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 1:14 PM

1 / 7
जगभरासह भारतभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाला नष्ट करण्यासाठी तसंच कोरोनाच्या माहामारीला नाहीसं करण्याासाठी जगभरातील देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे.
2 / 7
कोरोनाची लस आणि औषध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या उपायांनी कोरोनाला लांब कसं ठेवता येईल हे पाहीलं जातं आहे. असाच एक अनोखा प्रकार कोल्हापूरात पाहायला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील साळगाव इथल्या सचिन केसरकर या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांच्या माध्यमातून गो कोरोना गो चा संदेश दिला आहे.
3 / 7
या तरुण शेतकऱ्याने भात पिकाची लावण करताना ‘गो कोरोना गो’ अशी अक्षरं रेखाटली आहेत. त्याची ही अनोखी शक्कल आता सर्व विभागात चर्चेचा विषय ठरली आहे.
4 / 7
आता लोकं ही अक्षर पाहायला सचिनच्या शेताला भेट देत आहेत.
5 / 7
कोरोनाला पळवून लावण्यासाठी हिरव्यागार शेतात अशी अक्षरं काढल्याचं सचिनने सांगितले.
6 / 7
संपूर्ण जगाला कोरोनाशी लढण्यासाठी सचिनने या फोटोच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
7 / 7
सगळ्यात आधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोना गोची घोषणा दिली होती. त्यानंतर देशभर ते ट्रोलही झाले होते. त्यानंतर गो कोरोना हा डायलॉग सगळ्यांच्याच तोंडी आला.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या