शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घोडी अन् मालकीनीचे केस आहेत सारखेच सुंदर, लोक म्हणतात - दोघी आहेत जुळ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 5:19 PM

1 / 7
घोड्यांबाबत असं म्हटलं जातं की, त्यांच्यापेक्षा इमानदार प्राणी दुसरा नसतो. यात कुत्र्याचाही नंबर लागतो. पण कधी कधी मनुष्य या पाळीव प्राण्यांवर इतकं प्रेम करू लागतात की, एकतर ते त्यांच्यासारखे होतात नाही तर प्राणी मनुष्यांसारखे होतात. असंच नियोमीबाबत आहे. तिच्याकडे एक सुंदर घोडी आहे. पण लोक या दोघींना एकत्र बघून त्या जुळ्या असल्याचं म्हणतात.
2 / 7
नियोमी नेदरलॅंडची राहणारी आहे. तिची आणि तिच्या सुंदर घोडीची हेअऱस्टाईल एकसारखीच आहे. दोघींचेही केस कर्ली आहेत. जे फार सुंदर दिसतात.
3 / 7
नियोमीने तिच्या मुलाखतींमध्ये नेहमीच हे सांगितलं आहे की, जेव्हा ती लहान होती तेव्हापासून तिला एक घोडी खरेदी करण्याची इच्छा होती. जेव्हा तिने तिच्या या घोडीला पाहिलं तेव्हा तिला हीच घोडी हवी होती. तिला पाहिल्यावर असं वाटलं होतं की, जणू ही घोडी माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आली आहे.
4 / 7
नियोमीने तिच्या या घोडीचं नाव स्ट्रॉम ठेवलं आहे. याचा अर्थ वादळ, तूफान असा होता. नियोमी आणि स्ट्रॉर्मच्या मैत्रीला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ती सांगते की, 'ती फारच प्रेमळ आहे. मी तिच्यावर विश्वास ठेवू शकते'.
5 / 7
नियोमी तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे आणि स्ट्रॉमसोबतच फोटो नेहमीच शेअर करत असते. त्यांनी एकत्र अनेक फोटोशूटही केले आहेत. नियोमी सांगते की, फोटोशूटदरम्यान स्ट्रॉर्म फारच शांत राहते. ती मोठ्या प्रेमाने फोटोशूट करते. इन्स्टाग्रामवर नियोमीचे ५८ हजार फॉलोअर्स आहेत.
6 / 7
नियोमी तिचा जास्तीत जास्त वेळ स्ट्रॉर्मसोबत घालवते. दोघींना एकमेकींसोबत राहणं पसंत आहे. नियोमी तिच्यासोबत वॉकला जाते. या दोघींच्या जोडीचं आणि त्यांच्या प्रेमाचं लोक भरभरून कौतुक करतात.
7 / 7
नियोमी तिचा जास्तीत जास्त वेळ स्ट्रॉर्मसोबत घालवते. दोघींना एकमेकींसोबत राहणं पसंत आहे. नियोमी तिच्यासोबत वॉकला जाते. या दोघींच्या जोडीचं आणि त्यांच्या प्रेमाचं लोक भरभरून कौतुक करतात.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके