शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ॲडल्ट वेबसाइटवर न्यूड फोटो पाठवणं मॉडेलला पडलं महागात, आता 6 वर्षांचा तुरूंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 4:51 PM

1 / 8
म्यानमारच्या सत्तेवर सध्या लष्कराचा कब्जा आहे. मागील वर्षी 1 फेब्रुवारी रोजी आँग सान स्यू की यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून लष्कराने सत्ता हस्तगत केली होती. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टींवर बंदी आहे. अशातच प्रसिद्ध मॉडेल नांग म्वे सान हिला अटक करून 6 वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले.
2 / 8
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, मॉडेल नांग स्वे सान हिच्यावर संस्कृती आणि सन्मानाला नुकसान पोहचवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता तिला 6 वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला आहे.
3 / 8
या प्रसिद्ध मॉडेलने ॲडल्ट वेबसाइटच्या OnlyFans वर न्यूड फोटो पोस्ट केले असल्याचे बोलले जात आहे. नांग ही देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स व्यवहार कायद्याच्या कलम 33 (ए) अंतर्गत सोशल मीडीया साइटवर न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याबद्दल दोषी आढळली आहे. कायद्यानुसार अशा लोकांना जास्तीत जास्त सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
4 / 8
ही मॉडेल यांगून नॉर्थ डॅगन टाउनशिप येथील रहिवासी आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे असे क्षेत्र आहे जिथे मार्शल लॉ लागू आहे. अशा भागातील गुन्ह्यांचा आरोप असलेल्या लोकांवर लष्करी न्यायालयात खटला चालवला जातो, जिथे त्यांना वकिलाकडे जाण्यासारखे अधिकार नाकारले जातात.
5 / 8
म्यानमारमधील सर्वात मोठ्या तुरुंगातील इन्सेन जेल कोर्टात तिच्यावर खटला चालवला गेला, जिथे गेल्या वर्षी सत्ताबद्दल झाल्यापासून अनेक राजकीय मंडळींना तुरूंगात पाठवण्यात आले. मॉडेलच्या आईने बीबीसीशी बोलताना म्हटले की, त्यांनी अलीकडेच त्यांच्या मुलीशी संपर्क साधला आहे. मात्र आता तुरुंगात पाठवल्यानंतर त्यांचा त्यांच्या मुलीशी अजिबात संवाद होत नाही.
6 / 8
दरम्यान, नांग सानने यापूर्वी अनेकवेळा लष्कराविरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. खरं तर ती म्यानमारची अशी एकमेव महिला आहे, जिने चाहत्यांसाठी फोटो पाठवले म्हणून तिला तुरूंगात जावे लागले आहे.
7 / 8
नांग म्वे सानशिवाय आणखी एका मॉडेलला देखील यावर्षी अटक करण्यात आली आहे. त्या मॉडेलने सोशल मीडियावर लष्कराविरोधातील आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. याच कारणामुळे तिला ऑगस्टमध्ये अटक करण्यात आले.
8 / 8
लष्कराने सत्ता काबीज केल्यापासून खासदार, कार्यकर्ते आणि पत्रकारांसह 15,600 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यता संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने आतापर्यंत 12,000 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलArrestअटकMyanmarम्यानमारSex Lifeलैंगिक जीवन