32-32 इंच कुठं पाऊस पडत असतो का?, अजित पवार वस्तूस्थिती सांगतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 17:23 IST
1 / 10राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 2 / 10सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूर परिस्थितीची पाहणी करताना महिलांनी अजित पवारांकडे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यावर अजित पवारांनी त्या महिलांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. 3 / 10तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आणि खासदार 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्त भागासाठी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 4 / 10अजित पवार यांच्यासमवेत पाहणीदरम्यान जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.5 / 10हवामान खात्यानं आधीच सांगितलं होतं, 22, 23, 24 आणि 25 तारखेला मोठा पाऊस येणार आहे. आम्ही रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी केला होता. फ्री कॅचबेट एरियात एवढा पाऊस पडलाय, एवढा पाऊस पडलाय की...6 / 1032-32 इंच कुठं पाऊस पडत असतो का, आमच्या भागातीला सरासरी पाऊस 15 इंच एवढा आहे. तुम्ही तासगाव, खटाव, माण, इंदापूर, बारामती इकडच्या भागात केलात, तर इथली सरासरी 14 ते 15 इंच पावसाची आहे. 7 / 10पण, तेथीलही काही भागात 32 इंच पाऊस पडला आहे. मात्र, अशावेळी नेमकं त्या कमिटीच्या अहवालाचा दाखला देऊन बोट ठेवलं जातं. पण, असं काहीही झालेलं नाही, असे म्हणत प्रशासकीय दिरंगाई किंवा चूक नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. 8 / 10तसेच, पोलादपूरचा घाट हा पुढील काही दिवस सुरू होणार नाही, रस्ते 5 फूट खाली गेले आहेत. आता, पुण्याचे चीफ इंजिनिअर तिथं गेले असून त्यांचा पाहणी अहवाल येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले. 9 / 10नदी, नाले आणि ओढ्यांची जी क्षमता आहे, त्यापेक्षी अधिक पटीने हा पाऊस झाला आहे. त्यामुळे गावात पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे. 10 / 10कोल्हापूर आणि सांगलीला जोडणार पूलही पाण्याखाली होता. पण, आता हळूहळू तो सुरू होत आहे, ही वस्तुस्थिती आहे, असेही पवार यांनी सांगितले.