1 / 12१९९४ साली Louise Wallis यांनी वेगन डे पहिल्यांदा सुरू केला. तेव्हापासून दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस World Vegan Day म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने वेगन डाएटविषयी प्रचार आणि प्रसार केला जातो.2 / 12वेगन डाएटमध्ये मांसाहार तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे पुर्णपणे टाळले जातात. त्याऐवजी जास्तीत भर डाळी, कडधान्ये, फळे, सकामेवा यावर दिला जातो. हल्ली बरेच बॉलीवूड सेलिब्रिटी वेगन डाएट फॉलो करतात.3 / 12त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा. तिने वेगन डाएट सुरू केलं. ते पाहून तिचा नवरा क्रिकेटर विराट कोहली यानेही वेगन डाएट ही संकल्पना समजून घेतली, त्याला ती पटली आणि आता तो ही वेगन झाला आहे.4 / 12जॉन अब्राहमचे पिळदार शरीर आपण पाहतोच. पण तो म्हणतो की असं शरीर कमाविण्यासाठी मांसाहार किंवा दुग्धजन्य पदार्थांची मुळीच गरज नाही. तो मागच्या कित्येक वर्षांपासून वेगन डाएट घेतो.5 / 12सोनाक्षी सिन्हा देखील वेगन आहे. ती तर तिच्या फिटनेसचं आणि वेटलॉसचं सगळं श्रेय वेगन आहारशैलीला देते.6 / 12एक्स पत्नी किरण राव वेगन डाएट घेते, म्हणून आमिर खानही मागच्या अनेक वर्षांपासून वेगन झाला आहे. 7 / 12१०१९ या वर्षापासून श्रद्धा कपूरही वेगन झाली आहे. प्राणीमात्रांच्या प्रेमापोटी तिने हा निर्णय घेतला असून पेटा या संस्थेतर्फे तिला पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले आहे. 8 / 12मागच्या कित्येक वर्षांपासून मॅडी म्हणजेच आर. माधवनही वेगन डाएट घेतो. 9 / 12सोनम कपूरच्या फिटनेसचं सिक्रेटही वेगन डाएट आहे, असं ती सांगते. 10 / 12पर्यावरण आणि प्राणी प्रेम यांच्या प्रेमापायी आलिया भटही मागच्या ४ वर्षांपासून वेगन डाएट घेते. 11 / 12वयाची ८० वर्षे ओलांडणारे बिग बी अमिताभ बच्चनही वेगन डाएट फॉलाेव्हर आहेत.12 / 12बिंधास्त अभिनेत्री कंगना रानावतदेखील प्राणीमात्रांच्या बाबतीत खूपच संवेदनशील असून तिनेही मागच्या अनेक वर्षांपासून वेगन डाएट सुरू केले आहे.