शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

क्रिकेटपटू 'पृथ्वी शॉ'वर भयंकर आरोप करणारी भोजपूरी अभिनेत्री सपना गिल नेमकी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 4:11 PM

1 / 11
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ बरोबर मुंबईच्या रस्त्यावर राडा करणारी सपना गिल आता अडचणीत सापडली आहे. सपना गिलला ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे.
2 / 11
सपना गिल उर्फ ​​सना तिच्या काही मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी सांताक्रूझ येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्याचवेळी टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉही त्याच्या मित्रांसोबत तिथे डिनरसाठी गेला होता. दरम्यान, सपना पृथ्वीला तिच्या मित्रांबरोबर फोटो काढण्यास सांगत होती. पृथ्वीने त्यांना सेल्फी दिला पण सतत नकार देऊनही ते त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत राहिले.
3 / 11
यावर पृथ्वीने रेस्टॉरंटच्या मॅनेजरला फोन करून असे करणे थांबवण्यास सांगितले. त्यावेळी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी आणि व्यवस्थापकाने प्रकरण शांत केले आणि सपना आणि तिच्या मित्रांना तेथून हाकलून दिले, मात्र पृथ्वी त्याच्या मित्रांसह बाहेर आल्यावर प्रकरण आणखी वाढले.
4 / 11
यापूर्वी न्यायालयाने सपना आणि तिच्या मित्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. अशा स्थितीत वादात सापडलेली सपना गिल नेमकी आहे कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
5 / 11
सपना गिलचा जन्म पंजाबच्या चंदीगढमध्ये झाला होता. ३२ वर्षीय सपना सोशल मीडियावर तुफान एक्टिव्ह आहे. सपना आपल्या फॅन्सच्या आठवणीत राहण्यासाठी कायम फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते.
6 / 11
. सपना गिलनं आपल्या करीयरच्या सुरूवात भोजपुरी चित्रपटापांसून केली.
7 / 11
मेरा वतन या भोजपुरी सिनेमात तिनं डेब्यू केला होता. या चित्रपटात सपना गिलसोबत पवन सिंह मुख्य भूमिकेत होते.
8 / 11
यानंतर ती काशी अमरनाथ या चित्रपटात दिसून आली. या चित्रपटात सपना गिलसोबत अभिनेत्री आम्रपाली दुबे होती.
9 / 11
याशिवाय तिने भोजपुरी सिनेमातील निरहुआ आणि रवी किशन यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. सोशल मीडियावर सपना गिलची फॅन फॉलोअर्सही खूप जास्त आहे.
10 / 11
(Image Credit- Social Media)
11 / 11
(Image Credit- Social Media)
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPrithvi Shawपृथ्वी शॉ