शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

डेलीसोप क्वीन तुलसी विरानी पुन्हा येणार, एकेकाळी प्रेमात असलेले आता परत स्वीकारतील का तिला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2025 17:22 IST

1 / 6
एखादा चित्रपट, एखादं गाणं, एखादं नाटक खूप गाजतं आणि त्याच्या लोकप्रियतेचा नवा इतिहास घडतो.. तसंच काहीसं झालं होतं एका मालिकेच.. २५ वर्षांपुर्वी दुपारी ३: ३० आणि रात्री १०: ३० ही वेळ झाली की घरोघरी टीव्ही सुरू व्हायचे आणि त्यापाठोपाठच एक संगीत ऐकू यायचं...
2 / 6
त्यानंतर 'तुलसी' आपल्या सगळ्यांना नमस्कार करायची आणि तिच्या मोठ्ठ्या घराचं दार उघडून सगळ्या रसिकांना तिच्या घरात घेऊन जायची.. मग व्हायची एकेका सदस्याची भेट आणि शेवटी 'बां' जवळ सगळा 'विरानी' परिवार एकत्र यायचा आणि पुढच्या गोष्टीला सुरुवात व्हायची...
3 / 6
आठवलं ना हे सगळं कशाबद्दल बोललं जातंय? २५ वर्षांपुर्वी आलेल्या 'क्योंकी साँस भी कभी बहू थी' या मालिकेने त्या काळात लोकप्रियतेचा एक नवा विक्रम केला होता. फक्त ती मालिका पाहण्यासाठी अनेकजणांनी नव्याने केबल कनेक्शन घेतलं होतं..
4 / 6
मालिका हा महिलांच्या आवडीचा विषय. पण कित्येक पुरुषही ती मालिका आवडीने पाहायला लागले होते. रात्री १०: ३० ला 'क्योंकी'मध्ये काय होतंय हे पाहायचं आणि मगच झाेपायचं.. त्याशिवाय कित्येकांना चैन पडायची नाही. मिहिर विरानीचं निधन झालं होतं ते काही भाग आणि नंतर मिहिरचं कमबॅक या काही एपिसोडमध्ये तर प्रेक्षक असे काही टीव्हीला खिळून बसत होते की डोळ्याची पापणीही लवायची नाही..
5 / 6
त्यानंतर मालिका खूप खूप पुढे गेली... अनेक पात्रं बदलली आणि स्मृती इराणींनीही ती सोडली. त्यांचा राजकारणात प्रवेश झाला आणि मग 'तुलसी'च्या त्या 'स्मृती इराणी' झाल्या..
6 / 6
आता मात्र स्मृती इराणींसकट सगळा 'विरानी' परिवार पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. यावेळी कोणती पात्र येतील, तुलसीचं आयुष्य कसं असेल, तिची गोष्ट कोणत्या वळणाने पुढे जाईल याविषयी कित्येकांच्या मनात प्रचंड उत्सूकता आहेच. पण पुन्हा एकदा मालिका रसिकांना खिळवून ठेेवू शकेल का, वेबसिरीज, रिॲलिटी शो आणि शॉर्ट मुव्हीजच्या जमान्यात ती लोकप्रिय होईल का? असे प्रश्नही आहेतच.. तुम्हाला काय वाटतं?
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTelevisionटेलिव्हिजनSmriti Iraniस्मृती इराणी