सारा तेंडुलकरचे नथीचे कानातले, नथीचं नेकलेस; पाहा नथीचा नवा ट्रेण्ड- नथीचा नखरा सुरेख..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 12:14 IST2022-05-25T14:51:42+5:302022-05-27T12:14:55+5:30

१. सचिन तेंडुलकरच्या लेकीचा म्हणजेच सारा तेंडुलकरचा मराठमोळा लूक पाहून अनेक जण तिच्यावर जाम खुश झाले आहेत. कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात आणि आणि कानातल्यांमध्ये असणारे नथीचे डिझाईन यामुळे सारा अतिशय लाघवी दिसते आहे..

२. यावरूनच तर नथीचा नखरा आता सारासारख्या नव्या पिढीच्या बोल्ड, यंग आणि ब्यूटीफूल मुलींनाही आवडतो आहे, हेच दिसून येतं.

३. नथीचं डिझाईन सध्या अतिशय हिट झालं आहे. लग्नसराई असल्याने तर नथीचे दागिने आणि नथीचे प्रिंट असणारे कपडे यांनाही विशेष मागणी दिसून येते..

४. नथीच्या डिझाईन्समधला एक हिट दागिना म्हणजे मंगळसूत्र. नथीचं पेंडंट आणि काळे मणी असं नथ डिझाईनचं मंगळसूत्र लग्न झालेल्या प्रत्येक वयोगटातल्या स्त्रियांना आवडतं..

५. नथीच्या मंगळसूत्राला जेव्हा नथ डिझाईनच्या कानातल्यांची जोड मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने लूक बहरून येतो.

६. बुगड्या हा देखील एक मराठमोळा दागिना. पारंपरिक बुगड्यांची नक्षी वेगळी असली तरी सध्या अशा प्रकारच्या नथ डिझाईनच्या बुगड्यांना तरुणाईकडून विशेष मागणी आहे.

७. एवढंच नाही तर साडीवर लावायला ब्रुच म्हणूनही आजकाल नथीचं डिझाईन मिळत आहे. सध्या सुरू असणाऱ्या लग्नसराईमध्ये तर नववधूसाठी त्याला खूपच मागणी आहे.

८. नथ ब्रुचसोबतच भाव खाऊन जातेय ती नथीचं डिझाईन असणारी साडीपिन.. पारंपरिक काठपदर साड्यांवर ही पिन खरोखरंच खूप शोभून दिसते.

९. खणाच्या साडीवर असणारं नथ प्रिंट तर मागच्या १- २ वर्षांत प्रचंड भाव खाऊन गेलं होतं. अजूनही या साड्यांची तेवढीच क्रेझ आहे.

१०. नथ प्रिंटची साडी आणि त्यावर नथ प्रिंटचं ब्लाऊज हे कॉम्बिनेशनही जबरदस्त हीट होऊन गेलं..

११. एवढंच नाही तर सध्या त्याच्याच जोडीला नथ डिझाईन असणाऱ्या ओढण्यांचीही खूपच चलती आहे. प्लेन ड्रेस आणि त्यावर डार्क रंगाची खणाची ओढणी आणि त्यावर नथ असा प्रकार सध्या ट्रेण्डी आहे.