गुढीपाडवा : ‘असे’ कानातले सुरेख बाई, कानात शोभावे! प्रत्येकीकडे असावाच कर्णफुलांचा हा अस्सल सुंदर दागिना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 16:48 IST2025-03-26T16:33:00+5:302025-03-26T16:48:45+5:30

Traditional Heavy Gold Earcuff Earrings Designs : Earcuff Earrings Designs : गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक लूक हवा असेल तर तुम्हांला आवडतील असे कानातल्यांचे प्रकार...

कोणताही सणवार किंवा खास प्रसंग, कार्यक्रम असला की अगदी (Traditional Heavy Gold Earcuff Earrings Designs) साडीपासून ते कानातल्यांपर्यंत सगळं परफेक्ट असलंच पाहिजेच. कारण नुसती साडी, मेकअप आणि हेअरस्टाईलच चांगली असून उपयोग नाहीतर कानातलेही तितकेच छान हवेत. कानातल्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकीच एअर कफ हा कानातल्यांचा प्रकार तुमचा लूक अधिक खुलून आणण्यास मदत करतो.

संपूर्ण कानाला झाकून त्यांची सुंदरता वाढवणारा हा (Earcuff Earrings Designs) पारंपरिक कानातल्यांचा प्रकार आहे. जर लग्नासाठी टिपीकल महाराष्ट्रीयन नऊवारी नेसणार असाल तर हे कानातले त्यावर नक्कीच उठून दिसतील आणि तुमचा लुक परिपूर्ण करतील.

जर तुम्हाला स्टोन वर्क फार आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे स्टोन वर्क असणारे एअर कफ घालू शकता. या कानातल्यांमध्ये चमचमते स्टोन वर्क असल्याने इतर दागिन्यांपेक्षा कानातले अगदी उठून दिसतात.

मोराचे बारीक व नाजूक नक्षीकाम कानात अतिशय शोभून दिसते. मोराचे नाजूक नक्षीकाम असणारे हे गोल्डन एअर कफ तुम्हाला मराठमोळा व पारंपरिक लूक देऊ शकतात. नऊवारी साडीवर या प्रकारचे एअर कफ शोभून दिसतील.

जर तुम्हाला थोडा साधा लूक हवा असेल किंवा संपूर्ण कान झाकतील असे एअर कफ घालायचे नसतील तर तुम्ही अशा पद्धतीचे वेल प्रकारातील एअर कफ घालू शकता.

मोती आणि खड्यांचे एकत्रित वर्क असणारे एअर कफ देखील तुम्हाला अधिक सुंदर व आकर्षक लूक देऊ शकतील.

एअर कफ प्रकारात लाल - हिरव्या रंगांचे कुंदन वर्क केलेले कानातले देखील साडीवर अधिक शोभून दिसतात.

जर तुम्हाला साडीवर अधिक हेव्ही लूक हवा असेल तर तुम्ही एअर कफच्या खाली अशा प्रकारचे झुमके असणारे एअर कफ देखील घालू शकता.

तुम्ही अशा प्रकारे कानाच्या मागूनही घालता येऊ शकणारे वेगवेगळ्या डिझाइन्सचे एअर कफ देखील नक्की ट्राय करून पाहू शकता.

अशा प्रकारचे बारीक नक्षीकाम केलेलं भरजरी एअर कफ आणि सोबतच केसांच्या मागच्या भागात अडकवता येतील अशा वेल किंवा चेन देखील कानात घालू शकता.

जर तुम्हाला फार हेव्ही किंवा भरजरी लूक नको असेल तर तुम्ही अशा प्रकारचे नव्या ट्रेंडी स्टाईलचे वजनाने हलके आणि सहज काढता घालता येतील असे एअर कफ नक्की वापरुन बघू शकता.

ट्रेडिशनल प्रमाणेच तुम्ही अशा प्रकारचे एअर कफ वेस्टर्न आऊटफिटवर देखील घालू शकता. वेस्टर्न आऊटफिट वर अशा प्रकारचे एअर कफ खूप छान दिसतात.