उन्हाळ्यात ट्रिपला जा, फोटोत दिसा फॅशन क्वीन! ५ ट्रेंडी ड्रेस- पिकनिकसाठी स्पेशल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 18:05 IST2025-03-27T18:00:00+5:302025-03-27T18:05:01+5:30
Trendy summer vacation outfits for women: Beach outfit ideas for summer: Dinner date outfits for warm weather: Travel outfits for women summer style: Best summer dresses for vacation: Women’s fashion for summer beach days: Maxi dresses for summer vacations: जर आपण उन्हाळ्यात बीच, हिल स्टेशनवर जाणार असू तर हे ५ ट्रेंडी लूक आपल्या सौंदर्यात भर घालतील.

उन्हाळ्यात सुट्टीत बाहेर फिरायला जात असाल तर ५ ट्रेंडी ड्रेसचे पर्याय आपण वापरु शकतो. या उन्हाळ्याच्या सुट्टीत स्टायलिश दिसाल. (Trendy summer vacation outfits for women)
जर आपण उन्हाळ्यात बीच, हिल स्टेशनवर जाणार असू तर हे ५ ट्रेंडी लूक आपल्या सौंदर्यात भर घालतील. (Beach outfit ideas for summer)
फ्लॉय मॅक्सी ड्रेसेस उन्हाळ्यात सर्वाधिक घातले जातात. याचे फ्लोय फॅब्रिक आणि हलके डिझाइन आपल्याला अधिक सुंदर दिसते. बीचवर, डिनर डेटसाठी हा चांगला पर्याय आहे.
को-ऑर्डर सेट हा देखील उत्तम पर्याय आहे. हे टू-पीस आउटफिट कॅज्युअल आणि ग्लॅमरस लूकसाठी परिपूर्ण आहेत. हे आपण कोणत्याही ठिकाणी सहज घालू शकतो.
बीचवर आपण लिनेन आउटफिट ट्राय करु शकतो. हे कापड हलके असून अगदी आरामदायी आहे. उन्हाळ्यात आपल्याला या लूकमध्ये अधिक थंडावा मिळेल. पांढर्या, बेज किंवा पेस्टल शेड्स आपण वापरुन आपला लूक क्लासी करु शकतो.
रोमपर्स आणि जंपसूट हा देखील चांगला पर्याय आहे. हा आपल्या ट्रेंडी लूकसाठी परिपूर्ण आहे. हे आपण स्नीकर्स किंवा स्ट्रॅपी हील्ससह फ्लोरल किंवा सॉलिड कलरसोबत घालू शकतो.
बीच किंवा पूल साईड ठिकाणी जात असू तर प्रिंटेड कफ्तान ड्रेस हा पर्याय उत्तम आहे. हे कपडे अधिक स्टायलिश आणि सुंदर आहेत. ज्यामुळे आपली उन्हाळ्याची सुट्टी अधिक खास होते.