शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Summer Special - वाढत्या उन्हासाठी खास ब्लूम फ्लोरल पॅटर्न ड्रेस- दिसायला सुंदर आणि हलके कापड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 16:24 IST

1 / 6
ब्लूम ड्रेस स्टाइल म्हणजे हलकी, सैलसर आणि फुललेल्या आकाराची अशी ड्रेस स्टाइल. या प्रकारच्या ड्रेसमध्ये कपडा थोडा फुललेला किंवा गोलसर दिसतो, त्यामुळे तो घातल्यावर ड्रेसला ब्लूम म्हणजेच फुलल्यासारखा लूक येतो. म्हणून या स्टाइलला ब्लूम ड्रेस असे म्हणतात.
2 / 6
या ड्रेसची खासियत म्हणजे तो शरीराला खूप घट्ट बसत नाही. कंबर, हिप्स किंवा खालच्या भागात ड्रेस थोडा फुललेला असतो. त्यामुळे चालताना किंवा हलचाल करताना ड्रेस हलका आणि मोकळा वाटतो. विशेषतः उन्हाळ्यात ही स्टाइल खूप आरामदायी मानली जाते.
3 / 6
उन्हाळ्यात कॉटनचे असे सैलसर ड्रेस, कुर्ते, टॉप फारच आरामदायी ठरतात. त्यामुळे नक्कीच वापरायला हवेत. शिवाय दिसतातही फारच सुंदर. शिवाय विविध प्रकारचे असे सैलसर ड्रेस उन्हाळ्यात वापरणे त्वचेसाठी चांगले आहे.
4 / 6
ब्लूम ड्रेसमध्ये फ्रॉक्स, शॉर्ट ड्रेस, मिडी ड्रेस किंवा टॉप्सही येतात. या ड्रेसमध्ये स्लीव्हज थोड्या फुगलेल्या असू शकतात, स्कर्टचा भाग गोलसर आणि हलका असतो किंवा खालच्या बाजूला थोडा बलूनसारखा आकार दिलेला असतो. त्यामुळे ड्रेसला एक वेगळा आणि स्टायलिश लूक येतो.
5 / 6
फॅशनमध्ये ब्लूम ड्रेस स्टाइल प्रामुख्याने कॅज्युअल आउटिंग, समर पार्टी, ट्रिप किंवा डे-आउटसाठी वापरली जाते. हलक्या फुलांच्या प्रिंट्स, पेस्टल रंग किंवा कॉटन-लिनेन कापडात ही स्टाइल अधिक सुंदर दिसते. त्यामुळे हा ड्रेस घातल्यावर लूक फ्रेश, ट्रेंडी आणि आरामदायी वाटतो.
6 / 6
लांब बाह्या, छोट्या बाह्या दोन्ही उपलब्ध आहेत. शिवाय बिनबाह्यांचे पर्यायही यात उपलब्ध आहेत मध्ये विविध प्रकार मिळतात. तसेच हा प्रकार ऑनलाइन मोठ्या प्रमाणात मिळतो. शिवाय जवळच्याच बाजारात गेलात तरी आरामात मिळून जाईल. अगदी लग्नात घालू शकता असे प्रकारही त्यात आहे.
टॅग्स :fashionफॅशनSummer Specialसमर स्पेशलShoppingखरेदीWomenमहिलाSocial Viralसोशल व्हायरल