1 / 8उन्हाळा सुरु झाला की वातावरणात बदल होतो. या काळात आपल्याला उष्णता अधिक प्रमाणात जाणवू लागते. पुरेशा प्रमाणात हवा मिळत नाही आणि उन्हाळाच्या झळाळी सोसाव्या लागतात. (Summer curtain designs for home)2 / 8आपल्या घरात हवा खेळती असेल किंवा पत्र्याचे घर असेल तर उन्हाळ्यात अधिक प्रमाणात उकडते. आपण खिडकी किंवा दाराला असे काही पडदे लावतो ज्यामुळे घरात हवा खेळती राहात नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात गरम होते. यावेळी आपण काही सिंपल आणि हवा खेळती राहिल अशा पडद्यांचा वापर करायला हवा. (Printed curtains for summer)3 / 8उन्हाळ्यात आपल्या खोलीला वेगळा लूक द्यायचा असेल तर खिडक्यांवर रंगीबेरंगी प्रिटेंड पडदे लावू शकतो. यामुळे घरात हवा येईल. 4 / 8खिडक्या किंवा दारांवर आपण जाळीदार पडदे लावू शकतो. त्यामुळे घरात मच्छर किंवा कीटक येणार नाही. तसेच उष्णता देखील कमी जाणवेल. 5 / 8उन्हाळ्यात घरात हलक्या रंगाचे पडदे लावा. यामुळे खोलीची शैली देखील बदलेल आणि बाहेरची हवा घरात येईल. 6 / 8बेडरुमसाठी फ्लॉवर प्रिंटेड पडदे हा चांगला पर्याय आहे. या ठिकाणी आपण भिंतीशी आणि बेडशीटला मॅच होणाऱ्या पडद्याची निवड करु शकतो. 7 / 8उन्हाळ्यात जास्त उकडत असल्यामुळे बेडरुममध्ये रंगीबेरंगी पडदे लावू शकतो. प्रिटेंड फुलांमुळे खोलीचे सौंदर्य उजळून निघेल. 8 / 8उन्हाळ्यात डार्क रंगाचे पडदे वापरु नका. यामुळे जास्त प्रमाणात गरम होते. खोलीच्या खिडक्यांवर पांढऱ्या बेस प्रिंट असलेले पडदे वापरु शकता.