IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:53 IST
1 / 9गरीब कुटुंबात जन्मलेल्या अनुराधा पालची स्वप्नं मोठी होती. कोचिंगसाठी पैसे नव्हते, पण तिने चिकाटीने प्रयत्न केले. वडील दूध विकून कुटुंबाचं पालनपोषण करत होते. 2 / 9उत्तराखंडची रहिवासी असलेल्या अनुराधाने कठोर परिश्रमाने अशक्य गोष्टी शक्य होतात हे दाखवून दिलं आहे. सतत प्रयत्न आणि आत्मविश्वासाने तिने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि दोनदा परीक्षा उत्तीर्ण होऊन ६२ वा रँक मिळवला. 3 / 9परिस्थिती कितीही कठीण असली तरी, जर एखाद्याचा निश्चय दृढ असेल तर आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो हे सिद्ध केलं आहे. अनुराधा एका सर्व सामान्य ग्रामीण कुटुंबातून येते. 4 / 9लहानपणी तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या वडिलांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी दूध विकलं. पुढील शिक्षणासाठी तिने हरिद्वारच्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला.5 / 9कुटुंबाच्या परिस्थितीमुळे तिने एका ठिकाणी नोकरी केली. काही काळानंतर तिला समजलं की, यूपीएससी परीक्षा हेच तिचं खरं ध्येय आहे. तिने तिची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 6 / 9या काळात अनुराधाने रुरकी येथील एका महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम सुरू केलं. मिळालेल्या पैशातून आपल्या कोचिंगची फी भरली. परिस्थिती बिकट होती पण हार मानली नाही. 7 / 9२०१२ मध्ये अनुराधाने परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाली. तिने पुढेही तिची तयारी सुरू ठेवली. ती दिल्लीला गेली आणि यूपीएससी तयारीसाठी एकॅडमीमध्ये एडमिशन घेतलं.8 / 9अनुराधाने दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ६२ वा रँक मिळवला. २०१५ च्या यूपीएससी परीक्षेत तिने हा रँक मिळवला होता. तिने परिश्रम, समर्पण आणि चिकाटीने हे यश मिळवलं. 9 / 9अनुराधाने आयएएस बनून, अडचणींवर मात करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपलं साध्य करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना आता तिच्यापासून प्रेरणा मिळत आहे.