शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर हसू - मनात आसू! सतत आनंदी हसऱ्या व्यक्तीही असतात आतून दुःखी - पाहा नेमकं ओळखायचं कसं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 21:00 IST

1 / 13
आजकाल आपल्या आजूबाजूला अशा अनेक धक्कादायक (emotionally hurt people signs) घटना घडतात, ज्या ऐकून आपण सुन्न होतो. प्रत्येक हसणारा चेहरा आतून तितकाच सुखी आणि आनंदी असेलच असे नाही. आपल्यापैकी अनेकजण रोज सकाळी उठून जगासमोर वावरताना चेहऱ्यावर 'सगळं काही आलबेल' असल्याचा एक खोटा मुखवटा चढवून फिरत असतात. स्वतःचे दुःख, अपयश, मानसिक ताण आणि मनातील भयंकर वेदना जगापासून लपवण्यासाठी ही माणसे चेहरा कायम हसरा - आनंदी ठेवतात.
2 / 13
विशेष म्हणजे, आपल्यापैकी कित्येकजण कितीही सामान्य वागण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि सवयींमध्ये काही संकेत नकळत दिसून येतात. हे छोटे-छोटे संकेत त्यांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कल्पना देतात.
3 / 13
जर आपण वेळीच हे छुपे इशारे ओळखले, तर आपण आपल्या हसत्या-खेळत्या जवळच्या माणसाला एका मोठ्या मानसिक संकटातून किंवा नैराश्यातून (Depression) बाहेर काढू शकतो. एखादी व्यक्ती आपल्या सुंदर हास्यामागे मनातील भयंकर दुःख लपवत आहे हे सांगणारे 'ते ५ सर्वात मोठे आणि छुपे संकेत' कोणते? ते पाहूयात.
4 / 13
मानसशास्त्र (Psychology) असे सांगते की, जी माणसे आतून खूप दुखी किंवा अस्वस्थ असतात, ती अनेकदा गरजेपेक्षा जास्त आनंदी दिसण्याचा प्रयत्न करतात. ती प्रत्येक छोट्या गोष्टीवर हसतात, सतत विनोद करतात आणि इतरांना हसवण्याचा प्रयत्न करत राहतात. बऱ्याच वेळा त्यांचे हे अतिउत्साही वागणे म्हणजे आपल्या मनातील वेदना जगापासून लपवण्याचा एक हुकमी मार्ग असतो.
5 / 13
शक्यतो अशा व्यक्ती गर्दीमध्ये किंवा लोकांमध्ये वावरताना अगदी नॉर्मल दिसतात; पण जसा मिळेल तसा एकांत शोधतात आणि एकटे राहणे पसंत करतात. त्यांना आपल्या मनातील भावना कोणासोबतही शेअर करायच्या नसतात. त्यामुळे त्या व्यक्ती हळूहळू मित्रमैत्रिणी आणि कुटुंबापासून दूर जाऊ लागतात. हे लक्षण त्यांच्यातील भावनिक थकवा आणि मनातील एकटेपणा आणि दुःख दाखवते.
6 / 13
कधीकधी जी व्यक्ती दीर्घकाळापासून मानसिक दबावाखाली जगते आहे, ती अचानक खूप छोट्या - छोट्या गोष्टींवरही भावूक होऊ शकते. एखादा भावनिक चित्रपट पाहताना, गाणे ऐकताना किंवा अगदी साध्या प्रसंगातही त्यांच्या डोळ्यांत पाणी येणे हा या गोष्टीचा संकेत असू शकतो की, त्यांनी आपल्या मनामध्ये खूप काही दाबून ठेवले आहे जे आता बाहेर पडू पाहत आहे.
7 / 13
मानसशास्त्र (Psychology) असे सांगते की, जी माणसे स्वतः प्रचंड वेदनेत किंवा दुःखात असतात, ती अनेकदा इतरांचे दुःख खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतात. अशा व्यक्ती नेहमी इतरांना मदत करण्यासाठी, त्यांचे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना खूश ठेवण्यासाठी झटत राहतात. बऱ्याच वेळा स्वतःच्या त्रासावरून आणि विचारांवरून लक्ष भरकटवण्यासाठी ती मुद्दाम असे करतात.
8 / 13
जर एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी आपली अडचण किंवा स्वतःचा त्रास टाळण्यासाठी फक्त 'मी ठीक आहे' किंवा 'काही नाही, सगळं व्यवस्थित आहे' असे म्हणत असेल, तर हा सुद्धा एक मोठा संकेत असू शकतो. व्यक्ती भलेही ती आतून पूर्णपणे तुटलेली असो किंवा नसो आपल्या खऱ्या भावना जगापासून लपवण्यासाठी याच शब्दांचा ढाल म्हणून वापर करतात.
9 / 13
शक्यतो अशा व्यक्ती सध्याच्या वर्तमानात आनंदी नसतात. त्यामुळे ते बोलताना अनेकदा 'पूर्वी कसं छान होतं ना...' किंवा 'माझे ते दिवस किती सुखाचे होते...' अशा भूतकाळातील आठवणींचा जास्त उल्लेख करतात. सध्याच्या परिस्थितीतील वेदना विसरण्यासाठी त्यांचा मेंदू नकळत त्यांना जुन्या गोड आठवणींमध्ये घेऊन जात असतो.
10 / 13
स्वतःच्या मनातील वाईट विचारांना आणि दुःखाला मनात जागा मिळू नये, म्हणून ही लोकं स्वतःला कामात प्रचंड व्यस्त करून घेतात. ओव्हरटाईम करणे, सतत काहीतरी काम करत राहणे किंवा स्वतःला अजिबात रिकामा वेळ न देणे, हा स्वतःच्या भावनांना दाबून ठेवण्याचा आणि मनातील त्रासापासून पळून जाण्याचा एक मोठा प्रयत्न असतो.
11 / 13
जेव्हा कोणी या अशा व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या समस्येबद्दल विचारते, तेव्हा या व्यक्ती खूप हुशारीने त्या गंभीर विषयाची थट्टा उडवतात किंवा एखादा विनोद करून विषय बदलतात. स्वतःच्या मनाची खरी परिस्थिती कोणासमोर उघडी पडू नये, म्हणून ते 'विनोदाचा' वापर ढाल म्हणून करतात.
12 / 13
ज्या व्यक्तींचे मन आतल्या आत एखाद्या मोठ्या समस्येशी किंवा जुन्या वेदनेशी लढत असते, त्यांचा मेंदू सतत थकलेला असतो. त्यामुळे अगदी साध्या साध्या गोष्टी, जसे की- चावी कुठे ठेवली, कोणाचा फोन आला होता, किंवा एखादे काम करायचे राहिले, या गोष्टी ते वारंवार विसरू लागतात. कोणत्याही गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे त्यांना कठीण जाते.
13 / 13
मनात भयंकर नैराश्य किंवा दुःख दडवलेली व्यक्ती अनेकदा त्यांच्या झोपेचा किंवा खाण्यापिण्याचा त्याग करतात. एकतर त्यांना रात्री अजिबात झोप येत नाही किंवा ते जगाला सामोरे जाणे टाळण्यासाठी दिवसभर झोपून राहतात. खाण्याच्या बाबतीतही असेच घडते; अचानक भूक मंदावणे किंवा मानसिक ताणामुळे गरजेपेक्षा जास्त खाणे हा या व्यक्तींचा छुपा इशारा असतो.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल