शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratha Saptami 2025: करिना कपूर, शिल्पा शेट्टीसारख्या सेलिब्रिटींचं फिटनेस सिक्रेट आहे सुर्यनमस्कार, वाचा ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2025 09:15 IST

1 / 9
सुर्यनमस्कार हा एक पूर्ण व्यायाम म्हणून मानला जातो. कारण तो केल्यानंतर संपूर्ण शरीराचाच व्यायाम होतो. म्हणूनच तर करिना कपूर, शिल्पा शेट्टी, आलिया भट, मलायका अरोरा यांच्यासारखे सेलिब्रिटीही नियमितपणे सुर्यनमस्कार घालतात.
2 / 9
सूर्यनमस्कार घालत असताना त्याला श्वसनाची जोड दिली गेली आहे. म्हणजेच श्वास घेणे आणि सोडणे एवढेच अपेक्षित न ठेवता यामध्ये कुंभक म्हणजेच श्वास रोखणे याचाही अभ्यास सांगितला आहे.
3 / 9
सूर्यनमस्कार हे आबालवृद्ध, स्त्री, पुरुष अशा सर्वांकरिता अतिशय उपयुक्त आहे. सूर्यनमस्काराचे मूलभूत तंत्र शिकून घेतल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आवश्यकतेनुसार त्याचा अभ्यास करावा.
4 / 9
सूर्यनमस्कार जलद गतीने घातले तर वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात आणि संथ गतीने म्हणजेच एका मिनिटाला एक या गतीने घातला तर तो योगाभ्यास होतो. १० मिनिटांत साधारण १४ सूर्यनमस्कार घातले जाणे ही योग्य गती मानली गेली आहे.
5 / 9
नियमितपणे सुर्यनमस्कार घातल्यास शरीराची लवचिकता वाढते आणि हाडेसुद्धा मजबूत होतात.
6 / 9
पचनशक्ती चांगली होण्यासाठीही सुर्यनमस्कार उपयुक्त ठरतात.
7 / 9
सुर्यनमस्कार केल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे मनावरचा तसेच शरीरावरचा ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
8 / 9
हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यासाठीही सुर्यनमस्कार उपयुक्त ठरतात.
9 / 9
मुलांची उंची वाढण्यासाठीही सुर्यनमस्कार उपयुक्त ठरतात.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्यYogaयोगासने प्रकार व फायदेExerciseव्यायाम