शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आहारतज्ज्ञ सांगतात ड्रायफ्रुट्स खाण्याआधी 'ही' गोष्ट करा- अन्यथा तब्येत बिघडण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2024 14:10 IST

1 / 6
आपण वेगवेगळे ड्रायफ्रुट्स नेहमीच खातो. कधी कच्चे खातो, तर कधी भिजवून खातो. अनेक गोड पदार्थांमध्येही सुकामेवा हमखास टाकलाच जातो.
2 / 6
पण सुकामेवा खाण्यापुर्वी काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. याविषयीचा एक व्हिडिओ ryan_nutrition_coach या इन्स्टाग्राम पेजवर आहारतज्ज्ञांनी शेअर केला आहे.
3 / 6
यामध्ये ते सांगतात की कोणता सुकामेवा भिजवून खावा, कोणता तसाच खावा, सुकामेवा खाण्याची योग्य पद्धत, वेळ कोणती याविषयी अनेक वेगवेगळी मते आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, त्याकडे मात्र बहुतांश लोकांचं पुर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि ती गोष्ट म्हणजे सुकामेव्याची स्वच्छता...
4 / 6
आपण बघतो की होलसेलच्या दुकानांमध्ये बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड, मनुका यासारखे पदार्थ पोत्यांमध्ये भरून ठेवलेले असतात. ते लोक त्याची पुरेशी काळजी घेतात, पण तरीही पाल, उंदीर असे किटक त्या पोत्यांमधून, पोत्यांवरून फिरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
5 / 6
याशिवाय बऱ्याचदा दुकानांमध्ये सुकामेवा उघडाच राहातो. त्याच्यावर धूळ, घाण, जंतू बसण्याचा धोकाही नाकारता येत नाही. अशा पद्धतीचा सुकामेवा तुम्ही तसाच तोंडात टाकत असाल तर ते आरोग्यासाठी धाेकदायक ठरू शकतं.
6 / 6
त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही सुकामेवा खाल, तेव्हा सगळ्यात आधी तो पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतरच खा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत.
टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स