शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

त्वचा डल झाली? चेहऱ्यावर काही तेज नाही? प्या हे 'गुलाबी पाणी'-चेहऱ्यावर येईल गुलाबी लाली आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 3:35 PM

1 / 7
कडक उन्हाचा खूप जास्त त्रास आपल्या त्वचेला सोसावा लागतो. त्यासाठी आपण अगदी उन्हात गेलंच पाहिजे असं नाही. ज्यांना उन्हात जाऊन काम करावं लागतं, त्यांची त्वचा तर खराब होतेच, पण जे घरी असतात, त्यांच्या त्वचेवरही उन्हाचा, घामाचा, उष्णतेचा परिणाम होतोच.
2 / 7
त्यामुळेच उन्हाळ्यात त्वचा ड्राय होते, निस्तेज दिसू लागते आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्वचा खूप काळवंडून जाते.
3 / 7
शिवाय या दिवसांत खूप डिहायड्रेशन होतं. त्याचाही परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचेवरची चमक गेल्यासारखी वाटते. तुमच्या त्वचेवरही उन्हामुळे असाच परिणाम झाला असेल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा.
4 / 7
या उपाय आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी इन्स्टाग्रामवर सुचविला आहे. यामध्ये त्वचेवर ग्लो येण्यासाठी एक खास गुलाबी रंगाचं पाणी पिण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
5 / 7
हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ बीटरुट, १ काकडी, लिंबाचे काही तुकडे, पुदिन्याची पानं आणि मोसंबीच्या काही फोडी लागणार आहेत.
6 / 7
सगळ्यात आधी तर बीट, काकडी धुवून घ्या आणि त्यांचे बारीक तुकडे करा. लिंबू चिरून त्याच्याही फोडी करून घ्या तसेच पुदिन्याची पानं चिरून घ्या.
7 / 7
एका भांड्यात दोन ते अडीच लीटर पाणी घ्या. त्यात हे सगळं साहित्य टाका. आणि २ ते ३ तासांनी जेव्हा पाणी प्यावं वाटेल तेव्हा हेच पाणी प्या... हे पाणी नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणूनही काम करतं. यामुळे त्वचेवरही खूप छान परिणाम दिसून येतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीSummer Specialसमर स्पेशल