कपाटातल्या जुन्या बांधणी साडीचे पाहा सुंदर ड्रेसेस, बांधणी पॅटर्नची खास स्टाइल, दिसाल बोल्ड आणि स्टायलिश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 16:23 IST2025-03-28T16:10:09+5:302025-03-28T16:23:24+5:30
Convert Bandini Saree Into Dresses : 8 Ways To Creatively Re-Fashion Your Old Bandhani Saree : How To Transform Your Old Bandhani Saree : Old Bandhani Saree to New Designer Dresses : तुमच्याकडे बांधणीची साडी असेल तर, कोणकोणत्या पॅटर्नचे ड्रेस शिवू शकतो ते पाहा...

प्रत्येकीच्या कपाटात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि पॅटर्नच्या (8 Ways To Creatively Re-Fashion Your Old Bandhani Saree ) साड्या असतात. साड्यांच्या या अनेक प्रकारांमध्ये (How To Transform Your Old Bandhani Saree) किमान एक ना एक तरी बांधणीची साडी असतेच. याच बांधणीच्या साडीपासून आपण वेगवेगळ्या पॅटर्नचे ट्रेंडी ड्रेस देखील शिवू शकतो.
बांधणीच्या साडीपासून आपण कोणकोणत्या पॅटर्नचे (Old Bandhani Saree to New Designer Dresses) ड्रेस शिवू शकतो ते पाहूयात.
जर तुमच्याकडे एखादी बांधणीची साडी असेल तर तुम्ही त्यापासून असा लांब - घेरदार गाऊन शिवू शकता.
लाल, गुलाबी, पिंक अशा उठावदार बांधणीच्या साडीचा अनारकली ड्रेस अगदी सुंदर दिसतो. तुम्ही हा ड्रेस तुम्हाला हवा तितका घेरदार शिवू शकता.
तुम्ही बांधणी साडीचा प्लाझो आणि त्यावर तुम्हांला आवडेल अशा पॅटर्नचा एखादा शॉर्ट कुर्ता देखील शिवू शकता. बांधणीचा प्लाझो आणि कुर्ता खूप सुंदर व आकर्षक दिसेल.
बांधणी साडीचा लेहेंगा, पंजाबी सूट, घेरदार अनारकली ड्रेस असे वेगवेगळ्या पॅटर्नचे आऊटफिट्स तुम्ही शिवू शकता.
बांधणी साडीचा कफ्तान पॅटर्नचा हा ड्रेस देखील दिसायला फारच सुंदर दिसतो. आपण ऑफिस किंवा डेली वेअरसाठी असा कफ्तान पॅटर्नचा ड्रेस घालू शकता.
तुम्ही अशा प्रकारे बांधणी साडीचा ट्रेंडी जंपसूट देखील शिवू शकता.
बांधणी साडीचे असे सुंदर जॅकेट शिवून तुम्ही ते जीन्स, जंपसूट अशा वेगवेगळ्या आऊटफिट्सवर देखील घालू शकता.
तुम्ही अशा प्रकारे बांधणी साडीचा ट्रेंडी क्रॉप टॉप आणि त्यावर शोभून दिसेल अशी पॅन्ट देखील शिवून शकता.
जर तुम्हाला क्रॉप टॉपवर गरारा किंवा शरारा पँट्स आवडत असतील तर तुम्ही बांधणी साडीचा वापर करून आधी प्रकारे गरारा किंवा शरारा पँट्स देखील शिवू शकता.