म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
बटाटे उकडवताना टाळा ‘या’ चुका, बटाट्याची साल निघते पण आतून राहतो कच्चा, पोषणही मिळत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:35 IST
1 / 6भारतीय जेवणात बटाट्यांची भाजी खूप खाल्ली जाते. मग ते कोरडी असो वा रस्सेदार असो. बरेच लोक बटाट्याचे पराठे खातात, कुणी भजी खातात, तर कुणी आणखी कशा पद्धतीनं खातात. मात्र, हे नक्की की बटाटे भरपूर खाल्ले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाटे वेगवेगळ्या पद्धतीनं आवडतात. पण बटाटे उकडताना एक चूक जास्तीत जास्त घरात केली जाते. बटाटे लवकर सोलता यावे म्हणून काही ट्रिकही केल्या जातात. पण नंतर बटाटे आतून कच्चेच राहतात. अशात बटाटे उकडताना ५ गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.2 / 6बऱ्याचदा पाण्याचा अंदाज चुकतो त्यामुळे बटाटे जास्त शिजतात आणि मग तुटू लागतात. अशात बटाटे जास्त शिजले असतील तर फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. असं केल्यानं बटाटे टाइट होतील आणि बाहेरचा भाग तुटणार नाही. बर्फाच्या पाण्यात ठेवल्यानंही फायदा मिळतो.3 / 6बटाट्याची साल सहजपणे काढण्यासाठी लोक ते गरम पाण्यात उकडण्यासाठी ठेवतात. यानं बटाट्याचा वरचा भाग लवकर शिजतो, पण आतून कच्चाच राहतो. त्यामुळे बटाटे थंड पाणी टाकूनच उकडा.4 / 6किचनमधील मीठ कुकिंग हॅक्ससाठी फार कामात पडतो. जर बटाटे शिजल्यावर तुटत असतील तर कुकरच्या पाण्यात चिमुटभर मीठ टाका. यानं बटाट्याचा थर कडक होईल.5 / 6कूकरमध्ये जास्त बटाटे उकडताना जास्त पाणी टाकण्याची चूक करू नये. इतकंच पाणी टाका जे ४ शिट्यांमध्ये संपेल. मीडिअम गॅसवर बटाटे उकडा. यानं बटाटे तुटणार नाही. कमी बटाट्यांसाठी एक शिटी पुरेशी आहे.6 / 6कूकरमध्ये जास्त बटाटे उकडताना जास्त पाणी टाकण्याची चूक करू नये. इतकंच पाणी टाका जे ४ शिट्यांमध्ये संपेल. मीडिअम गॅसवर बटाटे उकडा. यानं बटाटे तुटणार नाही. कमी बटाट्यांसाठी एक शिटी पुरेशी आहे.