Navratri 2025 : लहान मुलामुलींसाठी खास नवरात्र स्पेशल कुर्ते आणि घागराचोली-पाहा खास मुलांच्या कपड्यांचं कलेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 13:36 IST2025-09-11T13:30:42+5:302025-09-11T13:36:32+5:30
Navratri 2025: Special Navratri dresses for children, See Special Children's Clothing Collection : नवरात्रीला घ्या खास कपडे. लहान मुलांसाठीचे पॅटर्न.

नवरात्र जवळ आली की बाजार विविध प्रकारच्या कपड्यांनी भरुन जातो. मस्त सुंदर चनियाचोली असेल किंवा घागरा अगदी मस्त प्रकार पाहायला मिळतात.
लहान मुलांसाठी तर आजकाल व्हरायटी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. एकदम मस्त पॅटर्न मिळतात. लहान मुलींसाठी चनियाचोली तसेच मुलांसाठी खास गुजराथी कुर्ता आणि पायजामा मिळतो.
गुलाबी आणि निळं हे कॉम्बिनेशन लहान मुलांवर अगदी सुंदर दिसतं. तशीच चनियाचोली नक्की घ्या.
मुलांसाठी छान रेडीमेड धोतर आणि कर गुजराथी स्टाईल कुर्ता तसेच टोपी अगदी मस्त दिसते.
नवरात्रीच्या दिवसात मुलांसाठी कपडे असतातच, मात्र मुलांसाठीही अनेक प्रकारचे कपडे उपलब्ध असतात.
काळ्या रंगाचा असा सुट मुलांवर एकदम उठून दिसेल. शिवाय कितीही नाचले तरी तो खराब दिसत नाही.
काळ्या घागऱ्यावर रंगीत पट्टीचे डिझाइन असलेला ड्रेस नक्कीच सुंदर दिसतो. नृत्य करताना आणखीच छान वाटतो.
लहान मुलींना गुलाबी रंगाची चनियाचोली एकदम सुंदर दिसेल. ओढणी टिपिकल स्टाईलमध्ये डोक्याला बांधायची.
रंगीबेरंगी असा घागरा लहान मुलींना अगदी क्युट लुक देतो. फार सुंदर दिसतो.
अगदीच लहान मुलींसाठी हलकासा या पॅटर्नचा ड्रेस मिळतो. त्याला छान घेर असतो. विविध रंगांचे कॉम्बिनेशन असते.