नॅशनल क्रश तृप्ती डिमरीसारखी सडपातळ कंबर हवी तर रोज सकाळी करा 'असा' व्यायाम, पाहा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 08:05 IST2025-04-05T08:00:00+5:302025-04-05T08:05:01+5:30

Trupti Dimri fitness routine: Trupti Dimri diet plan: National crush workout secrets: Celebrity weight loss tips: Slim figure workout plan: तृप्ती डिमरीसारखी फिगर आपल्याला हवी असेल तर नेमकी ती काय खाते आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम करते हे पाहूया.

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी अॅनिमनल चित्रपटानंतर अनेकांची क्रश म्हणून ओळखली जावू लागली. तिने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Trupti Dimri fitness routine)

अनेकांना तिच्यासारखे सुंदर आणि ग्लॅमरस दिसावे असे वाटतं असते. यासाठी तिच्या डाएट आणि फिटनेसचा प्लान फॉलो करु शकतो. (Trupti Dimri diet plan)

तृप्ती डिमरीसारखी फिगर आपल्याला हवी असेल तर नेमकी ती काय खाते आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम करते हे पाहूया.

तिच्या वर्क आउटबद्दल सांगायचे झाले तर ती जीममध्ये हार्डकोर वर्कआउट करते. तसेच दोन तास कार्डिओ, वेटलिफ्टिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, पिलेट्स आणि स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम करते.

ती ट्रेडमिलवर १० ते १५ मिनिटे धावते किंवा जॉगिंग करते. ज्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा मिळतो. तसेच शरीरात ऊर्जा निर्माण होते.

जिममध्ये घाम गाळण्यासोबत ती मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करते. सकाळच्या दिनचर्येत योगा करते. ज्यामुळे तिला मानसिक शांती मिळते.

आहारामध्ये ती फळे, हिरव्या भाज्या, उकडलेल्या भाज्या, कमी कॅलरीज असलेले अन्न, उच्च फायबरयुक्त अन्न आणि प्रथिनांसाठी दह्याचा समावेश करते.

ती उत्तराखंडमध्ये राहात असून तिला डोंगराळ भागातील जेवण अधिक आवडते. शुद्ध तुपात बनवलेले पदार्थ अधिक प्रमाणात खायला आवडतात.