Mother's Day 2025 Special: आईला द्या सोन्याचा खास दागिना! नोज पिन्सचे सुंदर प्रकार, खिशालाही परवडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 18:34 IST2025-05-08T18:11:10+5:302025-05-08T18:34:59+5:30
Mother’s Day 2025 Special Gift to Mom, gold nose pins: Latest gold nose pin designs for mom: सध्या बाजारात विविध प्रकारच्या नोज पिन्स उपलब्ध आहेत. ज्या आईला भेटवस्तू म्हणून देता येतील.

Mother's Day 2025 Gift Ideas
मे महिन्यातील दुसरा रविवार हा जगभरात मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आईचा तिच्या मातृत्वाचा सन्मान केला जातो. यंदाच्या मदर्स डे निमित्त आपण आपल्या आईला सुंदर सोन्याचा खास दागिना देऊ शकतो. सध्या बाजारात विविध प्रकारच्या नोज पिन्स उपलब्ध आहेत. ज्या आईला भेटवस्तू म्हणून देता येतील. (Mother’s Day 2025 gold nose pins)
फुलांनी सजलेली नोज पिन ही डिझाइन अतिशय सुंदर आहे. यामध्ये विविध रंगाचे खडे आपल्याला पाहायला मिळतात. दिसायला अगदी नाजूक असल्या तरी सौंदर्यात भर घालतात. (Latest gold nose pin designs for mom)
जर आपल्याला नाकात फुली घालायची नसेल तर प्रेस करता येणारं नाकातलं निवडू शकता. (Affordable gold nose pins 2025)
रोजच्या वापरातली नोज पिन्स हवी असेल तर आपण छोटी डायमंडची रिंग नाकात घालू शकतो. ज्यामुळे आपले सौंदर्य खुलून दिसेल.
सोन्यापासून बनवलेले नथ, लहान फुलांच्या नक्षीदार नोज पिन्स पारंपरिक आणि शोभून दिसतात.
पातळ सोन्याच्या तारांपासून बनवलेले वक्र किंवा हलके कानातले डिझाइन हा पारंपरिक पर्याय आहे. टाईमलेस फ्लोरल नॉट गोल्ड नोज पिन हे आधुनिकतेचे मिश्रण आहे.
नोज पिन्समध्ये सिल्व्हर, गोल्डन, ऑक्साईड किंवा बारीक डिझाइन्स असलेले वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतील.