शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दूध-दही की पनीर, आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक-बेस्ट काय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:56 IST

1 / 8
दूध, दही आणि पनीर खायला अनेकांना आवडतं. हे तीन दुग्धजन्य पदार्थ प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. पण अनेकदा प्रश्न पडतो की यापैकी सर्वात पौष्टिक आणि बेस्ट काय?
2 / 8
तुम्ही तुमच्या आहारात फक्त दुधाचा समावेश करावा की दही आणि पनीर देखील आवश्यक आहे? आरोग्य तज्ज्ञांनी या प्रश्नाचं आता उत्तर दिलं आहे आणि सांगितलं आहे की कोणते दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरू शकतात.
3 / 8
दूधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि बी१२ सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. मुलांच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या विकासासाठी दूध खूप फायदेशीर आहे. तसेच ज्यांना लैक्टोज इन्टॉलरेन्ची समस्या नाही त्यांच्यासाठी दररोज दूध पिणं फायदेशीर ठरू शकतं.
4 / 8
दही हे प्रीबायोटिक गुणधर्मांचे भांडार मानलं जातं. यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात. कॅल्शियम आणि प्रोटीनसोबतच दह्यामध्ये प्रोबायोटिक्स देखील असतात, जे पोटाच्या समस्या दूर ठेवतात.
5 / 8
विशेषत: उन्हाळ्यात दही खावं, कारण यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि प्रतिकारशक्ती वाढते. तसेच अनेकांच्या आहारात हमखास दह्याचा समावेश असतो, कारण यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
6 / 8
पनीर हे प्रोटीनचा चांगला सोर्स आहे आणि जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ते विशेषतः फायदेशीर मानलं जातं. कॅल्शियम आणि फॉस्फरस सोबतच व्हिटॅमिन बी १२ देखील पनीरमध्ये आढळतं.
7 / 8
पनीर स्नायूंना मजबूत करतं आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतं. मात्र पनीर मर्यादित प्रमाणात खावं जास्त खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. विशेषत: ज्यांना कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
8 / 8
या तिन्ही दुग्धजन्य पदार्थांची स्वतःची खासियत असून गरजेनुसार त्यांचा आहारात समावेश करावा, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. हाडांची मजबूती हवी असेल तर दूध सर्वोत्तम आहे. पचन सुधारण्यासाठी दही आणि प्रोटीनसाठी पनीर खाण्याचा सल्ला दिला आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सmilkदूधHealthआरोग्य