शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

फक्त पैठणीच नाही तर 'या' हॅण्डलूम साड्याही महाराष्ट्रात तयार होतात, तुम्हाला माहितीही नसतील नावं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2024 15:22 IST

1 / 8
पैठणी हे महावस्त्र महाराष्ट्राची ओळख आहे आणि ते जगभरात प्रसिद्ध आहे, यात वादच नाही. पण पैठणी व्यतिरिक्त इतरही काही हॅण्डलूम साड्या आहेत ज्या महाराष्ट्रात विणल्या जातात. त्या साड्या कोणत्या ते पाहा आणि तुमच्या कलेक्शनमध्ये त्यापैकी एखादी साडी नसेल तर चटकन घेऊन टाका.
2 / 8
हिमरू हा महाराष्ट्रातल्या औरंगाबादचा एक प्रसिद्ध कलाप्रकार. सुबक नक्षी आणि नाजूक विणकाम हे त्याचं वैशिष्ट्य. साडी, ओढणी, शाल, जॅकेट, बेडशीट, पडदे अशा वेगवेगळ्या प्रकारात तुम्हाला हिमरू मिळू शकते.
3 / 8
खण साडी हा प्रकारची दक्षिण महाराष्ट्रातला आहे. कर्नाटकमध्येही खण साडी विणणारे विणकर आहेत.
4 / 8
नारायण पेठ ही साडीही महाराष्ट्रातल्या सोलापूरमधली आहे. सिल्क आणि कॉटन अशा दोन्ही प्रकारात ती मिळते.
5 / 8
गंगाजमुना ही साडीही सोलापूरमध्ये तयार केली जाते. ती सिल्क प्रकारात मिळते आणि तिचे वैशिष्ट्य असे की ती दोन्ही बाजूंनी नेसता येते.
6 / 8
महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात गणेशपूर कोसा सिल्क साडीची निर्मिती केली जाते. या साडीवर प्रामुख्याने फ्लोरल आणि ॲनिमल प्रिंट दिसून येतं.
7 / 8
नागपूरची नागपूरी साडी ही देखील प्रसिद्ध आहे. या साड्या प्रामुख्याने पांढरा, क्रिम, मोतिया या रंगात दिसतात आणि त्यांचे काठ गडद रंगाचे असतात. यालाच करवट कटी साडी असंही म्हणतात.
8 / 8
भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये मुंगा आणि घिचा सिल्क या साड्यांची निर्मिती केली जाते. सिल्क, टस्सार सिल्क, कॉटन या प्रकारात ही साडी मिळते.
टॅग्स :fashionफॅशनsaree drapingसाडी नेसणेMaharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूरAurangabadऔरंगाबादnagpurनागपूर