1 / 8काबुली चणे म्हणजेच छोले चवीला फार मस्त असतात. त्याचे विविध पदार्थ करता येतात. त्यापैकीच काही सोपे पदार्थ पाहा आणि नक्की करा. 2 / 8चणा कोळीवाडा हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. स्टार्टर्ससाठी केला जातो. घरी करणे सोपे आहेच शिवाय तो काबुली चण्यांचाच असतो. नक्की करुन पाहा. 3 / 8उकडलेले काबुली चणे, टोमॅटो, काकडी, कांदा, कोथिंबीर आणि थोडा लिंबू रस मिसळून झटपट सॅलेड तयार होतं. त्यात काळं मीठ आणि थोडं चाट मसाला घातल्याने चव अधिक छान लागते.4 / 8कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांचा स्वादिष्ट तडका देऊन केलेली ही भाजी पूर्या, भात किंवा भाकरीसोबत मस्त लागते. पंजाबचा हा लोकप्रिय पदार्थ प्रथिनांनी भरलेला असतो.5 / 8उकडलेले काबुली चणे कुस्करून त्यात बटाटे, आले, हिरवी मिरची, आणि मसाले घालून कटलेट करतात. तव्यावर परतून घेतल्यावर मस्त कुरकुरीत लागतात.6 / 8उकडलेले चणे मिक्सरमध्ये फिरवून त्याचं सूप तयार करता येतं. त्यात भाज्यांचा स्टॉक, काळी मिरी आणि थोडं बटर घालून केलं हे सूप चविष्ट आणि पौष्टिक असतं.7 / 8हा लोकप्रिय पदार्थ उकडलेल्या काबुली चण्यांपासून करतात. मध्यंतरी सोशल मिडियावर हुमस फार प्रसिद्ध होते. त्यात ऑलिव्ह तेल, लिंबाचा रस, लसूण आणि इतर काही पदार्थ मिसळून तयार करतात, सॅंडविच किंवा भाज्यांसोबत खाल्लं जातं.8 / 8भातात उकडलेले काबुली चणे, कांदा, टोमॅटो आणि मसाले घालून केलेला चना पुलाव हे पौष्टिक आणि पोटभरीचे असते. दह्यासोबत ते अगदी अप्रतिम लागते.