संक्रांतीला जावयासाठी निवडा हलव्याचे सुंदर दागिने- लेकीसह जावयाचंही कौतुक- पहिला संक्रांतसण होईल स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2024 18:30 IST2024-01-10T18:18:48+5:302024-01-10T18:30:59+5:30

लग्नानंतर पहिली संक्रांत असेल तर मुलीसाठी, सुनेसाठी हमखास काळी साडी, हलव्याचे दागिने यांची खरेदी केली जाते.

आता काळानुसार सगळेच हौशी झाले आहेत. त्यामुळेच लेक- सून यांच्या प्रमाणेच आता मुलगा- किंवा जावयाची पहिली संक्रांत असेल तर त्यांच्यासाठीही काळे कुर्ते, हलव्याचे दागिने यांची खरेदी केली जाते.

म्हणूनच तर जावयाला कोणकोणते हलव्याचे दागिने देता येऊ शकतात, याचे हे काही खास पर्याय एकदा बघा... यात तुम्ही सिद्धार्थ चांदेकरच्या कानात बघत आहात तशी भिगबाळी जावयाला- मुलाला देऊ शकता.

असा छानसा कंठा द्या. हा एकच दागिना त्यांच्या गळ्यात उठून दिसेल.

हातात घालायला अंगठी आणि असं एखादं ब्रेसलेट दिलं तरी छान वाटतं.

पुरुषांसाठी खास असं हलव्याचं घड्याळही मिळतं. किंवा तुम्ही ते घरीही करू शकता.

हलव्यापासून तयार केलेलं असं स्टिकरही देऊ शकता. ते त्यांना लॅपटॉपला किंवा मोबाईलला लावता येईल.

आपल्याकडे शुभप्रसंगी नारळ देतात. असं हलव्याने सजवलेलं नारळ जावयाला द्या- भारी वाटेल...

खास संक्रांतीच्या निमित्ताने हलव्याच्या नाजूक माळा लावलेला फेटा किंवा पुणेरी पगडीही बाजारात मिळत आहेत.