शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात कॉटनच कशाला, त्याहून उत्तम फॅब्रिकचे ६ पर्याय, घाम गायब - दिवसभर वाटेल कूल आणि फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2026 14:03 IST

1 / 8
रणरणत्या उन्हाचं प्रमाण वाढलं की,अंगाची लाहीलाही होते आणि प्रचंड घाम येतो. अशावेळी आपण सर्वात आधी कपाटातून 'कॉटन'चे कपडे बाहेर काढतो. कॉटन आरामदायक असतंच, यात शंका नाही. पण, रोज रोज तेच तेच कॉटनचे कपडे घालून कंटाळा आला असेल आणि उन्हाळ्यातही आपल्याला स्टायलिश दिसायचं असेल, तर कॉटनला उत्तम पर्याय उपलब्ध आहेत(cotton alternatives for summer).
2 / 8
अनेकदा आपल्याला वाटतं की, सिल्क किंवा इतर फॅब्रिक्स उन्हाळ्यात टोचतील किंवा उष्णता वाढवतील. मात्र, काही असे फॅब्रिक्स आहेत, जे कॉटनसारखेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त ब्रीदेबल आणि हलके असतात. हे फॅब्रिक्स घाम शोषून घेतात आणि त्वचेला जळजळ होण्यापासून वाचवतात. आपण कॉटनशिवाय उन्हाळ्यात वापरता येणाऱ्या ५ जबरदस्त आणि आरामदायक फॅब्रिक्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला भर उन्हाळ्यातही कूल आणि स्टायलिश ठेवतील...
3 / 8
उन्हाळ्यासाठी लिनन हे कॉटननंतर सर्वात लोकप्रिय फॅब्रिक आहे. हे फ्लेक्स (Flax) वनस्पतीच्या धाग्यांपासून बनवले जाते. लिनन अत्यंत हलके असते आणि त्यातून हवा सहज खेळती राहते. जरी याला लवकर सुरकुत्या पडत असल्या, तरी याचा 'क्रश' लूक उन्हाळ्यात खूप रॉयल आणि स्टायलिश दिसतो. लिननचे कुर्ते, शर्ट्स आणि ट्राउझर्स उन्हाळ्यासाठी बेस्ट पर्याय आहेत.
4 / 8
भारताच्या हवामानासाठी खादी हे सर्वात योग्य फॅब्रिक आहे. हे हाताने विणलेले असल्यामुळे याच्या धाग्यांमध्ये सूक्ष्म छिद्रे असतात, ज्यातून हवा शरीरापर्यंत पोहोचते. खादी उन्हाळ्यात अंगाला चिकटत नाही आणि घाम लवकर शोषून घेते. हल्ली खादीमध्ये खूप आधुनिक आणि ट्रेंडी डिझाइन्स उपलब्ध आहेत, जे तुम्हाला एक वेगळा 'स्टेटमेंट लूक' देतात.
5 / 8
रेयॉन हे एक सेमी - सिंथेटिक (Semi-synthetic) फॅब्रिक आहे, जे लाकडाच्या लगद्यापासून (Wood Pulp) बनवले जाते. हे अतिशय मऊ, हलके आणि अंगावर छान 'ड्रेप' होणारे असते. रेयॉनमध्ये उष्णता साचून राहत नाही, त्यामुळे ते उन्हाळ्यात थंड वाटते. मॅक्सी ड्रेसेस, कुर्तीज आणि लूझ टॉप्ससाठी रेयॉन हा एक उत्कृष्ट आणि स्वस्त पर्याय आहे.
6 / 8
जर तुम्हाला उन्हाळ्यात डेनिम घालायला आवडत असेल, पण जाड कापडामुळे ते टोचत असेल, तर शेंब्रे फॅब्रिक हा बेस्ट पर्याय आहे. शेंब्रे दिसायला डेनिमसारखेच दिसते, पण ते कॉटनपासून बनवलेले असते आणि अत्यंत हलके व ब्रीदेबल असते. डेनिम शर्ट्स किंवा जीन्सऐवजी तुम्ही शेंब्रेचे शर्ट्स, कुर्तीज आणि स्कर्ट्स वापरू शकता.
7 / 8
मलमल हे एक अत्यंत तलम आणि मऊ सुती कापड आहे. याला 'वोकन एअर' (Woven Air) असेही म्हटले जाते कारण ते वजनाला इतके हलके असते की अंगावर कपडे आहेत की नाही, याचा भासही होत नाही. हे कापड त्वचेला अजिबात टोचत नाही, त्यामुळे लहान मुलांसाठी आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी हे उत्तम आहे. या प्रकारच्या कापडांतून हवा खूप सहज खेळती राहते, ज्यामुळे घाम येत नाही आणि शरीर थंड राहते. मलमलचे कापड धुतल्यानंतर खूप लवकर सुकते, जे उन्हाळ्यात सोयीचे ठरते. लमलच्या साड्या, दुपट्टे आणि अनारकली कुर्ते केवळ दिसायलाच सुंदर नसतात, तर ते तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतात. विशेषतः लखनवी चिकनकारी काम केलेल्या मलमलच्या कुर्तीज उन्हाळ्यात एक वेगळीच 'एलिगंट' स्टाईल देतात.
8 / 8
बांबूच्या फायबरपासून बनवलेले कपडे अलीकडे खूप लोकप्रिय होत आहेत. हे कापड अत्यंत मऊ आणि पर्यावरणास पूरक असते. यात नैसर्गिकरीत्या ‘अँटी-बॅक्टेरियल’ गुणधर्म असतात, जे घामामुळे येणारी दुर्गंधी रोखण्यास मदत करतात. बांबू फॅब्रिक हे सुती कापडापेक्षा जास्त घाम शोषून घेते आणि त्वचेला अत्यंत थंड स्पर्श देते. ज्यांना जास्त घाम येतो, अशा लोकांसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्सSummer Specialसमर स्पेशल