म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 10आजच्या आधुनिक युगात लोक चमच्याने आणि काट्याने जेवणं हे स्टाईल आणि स्वच्छतेचं प्रतीक मानतात. त्यामुळे आता आधीच्या काळातील हाताने जेवण्याची सवय हळूहळू कमी होत आहे. हाताने जेवणं ही फक्त परंपरा नाही तर ते सायंटिफिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर आहे. 2 / 10भारतासह संपूर्ण जगात गेल्या काही दशकांत चमच्याने जेवण्याचा हा ट्रेंड वाढला आहे. विविध अभ्यासातून हातांनी अन्न खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे परदेशातही आता आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ वाढताना दिसत आहे. 3 / 10संस्कृतीनुसार, आपलं शरीर पाच तत्वांपासून बनलेलं आहे आणि बोटं वेगवेगळ्या तत्वांची ओळख आहेत. अंगठा अग्नीशी संबंधित आहे, तर तर्जनी वायुशी संबंधित आहे. मधली बोट आकाशाशी आणि अनामिका बोट पृथ्वीशी संबंधित आहे, तर करंगळी जल म्हणजेच पाण्याशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही ही पाच बोटं एकत्र करून अन्न खाता तेव्हा त्याचा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम होतो.4 / 10हातांनी जेवताना आपण किती खावं, काय खावं, कोणत्या वेगाने खावे हे समजू शकतो, ज्यामुळे पचन नीट होतं. हातांनी जेवल्याने अन्नाचं प्रमाण ठरवतो, ज्यामुळे अधिक अन्न खाणं टाळलं जातं. 5 / 10हाताने खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहते आणि अन्न लवकर पचते. आयुर्वेदानुसार, जेव्हा तुम्ही तोंडात घास ठेवता तेव्हा तुम्ही योगमुद्रेच्या स्वरूपात बोटं हलवता, ज्यामुळे अन्न लवकर पचतं.6 / 10जेवताना जसा तुम्ही हात हलवता तसतसे शरीरातील अनेक गोष्टी बदलतात. यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण नीट होतं.7 / 10जेव्हा तुम्ही हाताने अन्न खाता तेव्हा तुमच्या बोटांच्या अन्नाचं तापमान जाणवतं आणि तुम्हाला अन्न किती गरम किंवा थंड आहे याचा अंदाज येतो. मेंदू त्यानुसार काम करतो.8 / 10हातांनी जेवण्यामागे आपला सांस्कृतिक संबंध देखील आहे. शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की, अन्न ब्रह्म आहे, रस विष्णू आहे आणि भोक्ता महेश्वर आहे. हातांनी जेवल्याने आपण अन्नाबद्दल आपला आदर दाखवतो आणि आपल्या शास्त्रांमध्ये अन्न सेवनाशी संबंधित अनेक श्लोक आहेत.9 / 10हातांनी किंवा चमच्याने जेवणं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार आहे. चमच्याने जेवलात म्हणजे तुम्ही आधुनिक आणि हाताने जेवलात तर तुम्ही जुन्या विचारांचे असं अजिबात नाही.10 / 10अनेकांना हातानेच जेवायला आवडतं. जेवल्याचं समाधान मिळतं. हातांनी जेवण्याचे शरीराला असंख्य फायदे होतात. मात्र जेवणाआधी आणि जेवल्यानंतर हात स्वच्छ धुणं अत्यंत आवश्यक आहे.