चंद्रकोर मंगळसूत्र डिझाइन्स, गळ्यात शोभून दिसेल खास पारंपरिक साज-चारचौघीत मिरवा नटून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2025 14:39 IST2025-11-03T20:20:20+5:302025-11-04T14:39:38+5:30

Latest Chandrakor Mangalsutra Designs : Chandrakor design mangalsutra : new Chandrakor style mangalsutra : चंद्रकोर डिझाईन्सच्या मंगळसूत्राची जादू, पारंपरिकतेचा आधुनिक साज दिसेल गळयात शोभून...

'मंगळसूत्र' हा फक्त सौभाग्य अलंकार नसून, प्रत्येक नववधूसाठी मंगळसूत्र म्हणजे (Latest Chandrakor Mangalsutra Designs) तिच्या वैवाहिक जीवनाचा अविभाज्य भाग. काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्येही नवनवीन ट्रेंड येत आहेत, यापैकीच एक आहे 'चंद्रकोर डिझाईन'! चंद्रकोरीची आकर्षक वळणे आणि तिच्यातील नाजूक कलाकुसर मंगळसूत्राला एक वेगळीच ओळख देतात.

पारंपरिकतेचा स्पर्श कायम ठेवून, आधुनिकतेशी सांगड घालणाऱ्या या डिझाईन्स सध्या (New Chandrakor Style Mangalsutra) खूप पसंत केल्या जात आहेत. चंद्रकोरीच्या डिझाईन्समध्ये विविधता आढळते; काही मंगळसूत्रे नाजूक चंद्रकोरींनी सजलेली असतात, तर काही मोठ्या आणि ठसठशीत चंद्रकोरींमुळे उठून दिसतात.

आजकाल पारंपरिक दागिन्यांमध्येही आधुनिक टच देण्याचा ट्रेंड आहे. त्यातही चंद्रकोर डिझाईन्सचे मंगळसूत्र सध्या महिलांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. या डिझाईन्समध्ये पारंपरिकतेसोबतच एक रॉयल आणि एलिगंट लूक दिसतो.

गोल्ड, डायमंड, रोजगोल्ड आणि टेंपल डिझाईन्समध्ये उपलब्ध असलेली ही चंद्रकोर मंगळसूत्र डिझाईन्स कोणत्याही प्रसंगी आपल्या लूकला उठाव देतात.

तुम्हीही तुमच्या कलेक्शनमध्ये किंवा तुमच्या खास दिवसासाठी एक अनोखे मंगळसूत्र शोधत असाल, तर चंद्रकोर डिझाईन्स नक्की एकदा ट्राय करुन पाहा.

१. नाजूक चंद्रकोरचे पेंडंट असलेलं मंगळसूत्र एकदम क्लासी आणि हटके लूक देतं. बारीक मण्यांच्या चेनमध्ये सुंदर आणि नाजूक चंद्रकोरीच पेंडंट फार शोभून दिसत, जे रोज वापरण्यासाठी उत्तम आहे.

२. या डिझाईनमध्ये चंद्रकोरीच्या आकारात हिऱ्यांचे सुंदर जडाऊकाम केलेले आहे, ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसते. `

३. चंद्रकोरचे पेंडंट असलेल मंगळसूत्र, पारंपरिक डिझाईन्समध्ये अधिक सुंदर दिसते, ज्यात चंद्रकोरीला सोन्याच्या नाजूक कलाकुसरीने सजवले आहे. `

४. पारंपरिक साऊथ इंडियन टच देणारे हे टेंपल डिझाईन चंद्रकोर मंगळसूत्र सण - समारंभासाठी उत्तम आहे.

५. मिनिमलिस्ट चंद्रकोर मंगळसूत्र ऑफिस किंवा कॅज्युअल वापरासाठी हलके, ट्रेंडी आणि आकर्षक पर्याय आहेत.

६. चंद्रकोर डिझाईन्समध्ये कलरफुल स्टोनने सजवलेले डिझाईन फारच युनिक आणि ग्रेसफुल दिसतात.

७. नेहमीचे पारंपरिक चंद्रकोर डिझाईन आणि सोबत सुंदर, नाजूक मोतीवर्क केलेल मंगळसूत्र पेंडंट तुमचा लूक अधिकच खुलून दिसण्यास मदत करतात.

८. सध्या असे नाजूक कमळाचे डिझाइन्स असलेले दागिने फारच ट्रेंडी आहेत. त्यामुळे चंद्रकोर आणि असे रंगीबेरंगी कमळाचे डिझाईन्स असलेले मंगळसूत्र घातल्यास इतर कोणताही नेकलेस किंवा दागिन्यांची गरजच भासत नाही.