1 / 7जन्माष्टमीच्या निमित्ताने घरोघरी गोपालकाला करून श्रीकृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो (janmashtami special gopal kala). आपणही त्याच वेळी काला खातो. एरवी वर्षभर आवर्जून काला केला आणि तो खाल्ला असं होत नाही.2 / 7म्हणूनच आता गोपाल काला खाण्याचे हे काही फायदे वाचा. ते एकदा लक्षात घेतले तर इथून पुढे तुम्ही नेहमीच आवडीने गोपालकाला करून खाल..(benefits of eating gopal kala) 3 / 7गोपाल काला करताना आपण त्यामध्ये पोहे, दही असे पदार्थ घालतो. पोहे पोटाला दमदार राहतात. पोहे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही.4 / 7शिवास दही हे प्रोबायोटिक असतं. दह्यामधून प्रोटीन्स मिळतात. त्याशिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ ही काही प्रमाणात मिळते.5 / 7दही आणि पोहे हे एक उत्तम फूड कॉम्बिनेशन मानलं जातं. त्यातून बऱ्याच प्रमाणात फायबर आणि मिनरल्स मिळतात. 6 / 7याशिवाय गोपाल काला करताना त्यात आलं, कोथिंबीर, धने, जिरे असे पदार्थही घातले जातात. हे सगळेच पदार्थ पचनक्रिया अधिक चांगली करण्यासाठी मदत करतात.7 / 7गोपाल काल्यामध्ये डाळवंही असतं. त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. त्यामुळेच एवढा बहुगुणी असणारा गोपाल काला नेहमीच सकाळी नाश्त्यासाठी अगदी उत्तम आहे.