गोल चेहरा असेल तर टाळा ‘हे’ नेक पॅटर्न, चेहरा दिसतो भप्प सुजल्यासारखा जाडजूड-पाहा काय वापरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 17:43 IST2025-09-10T17:37:01+5:302025-09-10T17:43:22+5:30

If you have a round face then avoid these neck patterns, it will make your face look swollen and thick - see what to use : चेहरा गोलाकार असेल तर पाहा कोणते नेक पॅटर्न वापरावेत आणि कोणते टाळावेत.

चेहर्‍याचा आकार सगळ्यांचा वेगवेगळा असतो. काहींचा चेहरा लांबट असतो तर काहींचा गोल असतो. खरेतर आपण कोणत्या पॅटर्नचे रंगाचे कपडे घालतो हे ठरवताना विविध गोष्टींचा विचार करतो. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे चेहर्‍याचा आकार.

एखाद्याच्या चेहर्‍याचा आकार त्याच्या ड्रेसिंगवर नक्कीच परिणाम करु शकतो. अनेक जणांचा चेहरा गोल असतो. त्यामुळे चेहरा फुगलेला किंवा जाड दिसतो. मात्र गोलाकार चेहरा असल्यावर योग्य नेक पॅटर्नचे कपडे घालून लूक एकदम मस्त करता येतो.

चेहरा गोल असेल तर काही पॅटर्न वापरणे टाळा. कारण त्यामुळे चेहरा आणखी फुगीर दिसतो. मग काही जणींचा आत्मविश्वास कमी होतो. योग्य प्रकारचे कपडे वापरणे नक्कीच मदत करते.

फुल नेक पॅटर्न आजकाल फार प्रसिद्ध आहे. फक्त ब्लाऊज नाही तर टॉप्स आणि ड्रेसमध्येही हा पॅटर्न आहे. मात्र जर चेहरा गोलाकार आहे तर हा पॅटर्न सुंदर दिसण्याऐवजी त्यामुळे चेहरा सुजलेला दिसतो. हा पॅटर्न वापरणे टाळा.

तसेच मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने बोटनेक प्रकार जरी छान दिसला तरी असा ब्लाऊज चेहरा फुगीर असल्याचे भासवतो. सगळ्यांनाच तो पॅटर्न शोभत नाही.

खरंतर डिप नेक हा प्रकार गोलाकार चेहऱ्यावर शोभून दिसतो. चेहर्‍याचा आकार मोठा असल्याने असे पॅटर्न छान वाटतात.

गोलाकार गळ्याचा ड्रेस गोलाकार चेहऱ्यावर अजिबात छान वाटत नाही. त्यामुळे चेहरा वयापेक्षा जास्त मोठा दिसायला लागतो. तरुण मुलींनी खास असा पॅटर्न टाळावा. गळ्या लगत गोलाकार असा पॅटर्न करण्यापेक्षा पान, हार्ट असे शेप द्या.

व्ही नेक शेप गोलाकार चेहरा असेल तर नक्कीच सुंदर दिसेल. वापरुन पाहायला हरकत नाही. डीप व्ही घ्या किंवा लहान कट असलेला वापरा. छानच वाटेल.