शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:25 IST

1 / 10
वाढतं प्रदूषण आणि थंडीमुळे सायलेंट स्ट्रोक (पॅरालिसिस) चा धोका देखील असतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी प्रदूषण आणि थंडीपासून स्वतःचं संरक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
2 / 10
विशेषतः ज्यांना आधीच हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या आहेत. प्रदूषणामुळे सायलेंट स्ट्रोक का होऊ शकतो? हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल असलेल्यांना धोका का आहे आणि तो कसा टाळायचा याबाबत जाणून घेऊया...
3 / 10
तज्ज्ञ म्हणतात की, प्रदूषणातील नायट्रोजन डायऑक्साइडसारखे कण केवळ फुफ्फुसांनाच नव्हे तर मेंदूलाही नुकसान पोहोचवतात. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो, हा एक प्रकारचा स्ट्रोक आहे ज्याची लक्षणे सहज ओळखता येत नाहीत.
4 / 10
सायलेंट स्ट्रोकमुळे मेंदूच्या लहान नसांमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे पॅरालिसिस होतो. मॅक्स हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी विभागाचे युनिट हेड डॉ. दलजीत सिंह स्पष्ट करतात की, या काळात प्रदूषण आणि थंडी देखील वाढली आहे.
5 / 10
वाढत्या प्रदूषणामुळे पीएम २.५ लेव्हलमध्ये वाढ झाली आहे. हे लहान प्रदूषित कण श्वासाद्वारे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात आणि नंतर रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरात पसरतात. ते मेंदूतील नसांना देखील नुकसान पोहोचवू शकतात.
6 / 10
ते नसांमध्ये जळजळ निर्माण करतात आणि रक्त घट्ट करतात. यामुळे नसांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे मेंदूला नुकसान होतं. हे विशेषतः हाय ब्लड प्रेशर असलेल्यांसाठी घातक आहे. कारण या लोकांना आधीच नसांमध्ये ब्लॉकेजचा धोका जास्त असतो.
7 / 10
वाढत्या प्रदूषणामुळे हा धोका आणखी वाढतो. अशा परिस्थितीत, प्रदूषण आणि थंडीच्या मिश्रणामुळे सायलेंट ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत.
8 / 10
सतत तीव्र डोकेदुखी, चालताना संतुलन बिघडू शकतं, अंधूक दिसणं, सकाळी उलट्या होणं अशी लक्षणं आढळतात. सायलेंट स्ट्रोक टाळण्यासाठी आधी प्रदूषण आणि थंडीपासून स्वतःचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे.
9 / 10
मास्क घाला आणि सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जाणे टाळा. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा हाय कोलेस्ट्रॉल असेल तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ती थांबवा.
10 / 10
जर तुम्हाला सायलेंट स्ट्रोकचं एकही लक्षण दिसलं तर ताबडतोब रुग्णालयात जा आणि सल्ला घ्या. निष्काळजीपणा टाळा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स