लोखंडाच्या कढईत पदार्थ लागतो- लवकर करपतो? ४ टिप्स - कढई वापरण्याची योग्य पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 15:16 IST2025-09-12T15:12:32+5:302025-09-12T15:16:47+5:30

Iron kadhai tips: Iron cookware maintenance: How to season iron kadhai: Food sticking in iron kadhai solution: लोखंडाच्या कढईत पदार्थ बनवताना जळतात, या टिप्स लक्षात ठेवा.

आपल्या स्वयंपाकघरात अनेक भांडी असतात, ज्यामध्ये आपण विविध प्रकारचे जेवण बनवतो. पण अनेकांच्या घरात आजही लोखंडाची कढई पाहायला मिळते. (Iron kadhai tips)

आजकाल बरेच लोक नॉन-स्टिक पॅन वापरतात कारण ते स्वच्छ करण्यास अधिक सोपे जाते. लोखंडी कढईत स्वयंपाक करण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की पदार्थामध्ये लोहाचे प्रमाण वाढते, चव बदलते. पण अनेकदा पदार्थ बनवताना ते जळतात. अशावेळी शेफ पंकजांनी दिलेल्या या ४ टिप्स लक्षात ठेवा.(Iron cookware maintenance)

लोखंडी कढई गॅसवर ठेवा. ती मोठ्या आचेवर चांगली तापवून घ्या. कढई पूर्ण कोरडी होऊन धूर निघू लागेपर्यंत गरम करा. यामुळे कढईच्या पृष्ठभागावरील घाण आणि ओलावा निघून जातो.

पॅन चांगला गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर ठेवा. त्यात १ ते २ चमचे स्वयंपाकाचे तेल घाला. यात आपण मोहरीचे तेल, रिफाइंड तेल आणि वनस्पती तेल घालू शकतो. तेल घातल्यानंतर टिशू किंवा सुती कापडाच्या मदतीने परसवून घ्या.

तेल पसरवल्यानंतर गॅस फास्ट करा आणि पुन्हा गरम होऊ द्या. यावेळी कढईमधून धूर येऊ लागेल. पुन्हा कढईत तेल घाला. यामुळे कढईला नॉनस्टिक सारखा थर तयार होईल.

कढई थंड झाल्यानंतर टिशूने स्वच्छ पुसा. यामुळे जास्तीचे तेल निघून जाईल. त्यानंतर आपण लोखंडी कढईवर पदार्थ शिजवले तर चिकटण्याचा आणि जळण्याचा ताण राहणार नाही.

या पद्धतीला सिझनिंग असं म्हटलं जातं. यात लोखंडाच्या पृष्ठभागावर तेलाचा पातळ किंवा गुळगुळीत थर तयार करुन अन्नपदार्थ शिजवले जातात. ज्यामुळे पदार्थ चिकटत नाहीत.